दहशतीच्या राजकारणाविरोधात एकजूट व्हा: बराक ओबामा

लॉस एंजेलिस (अमेरिका): दहशतीच्या राजकारणाविरोधात सर्वांनी एकजूट होण्याचा सल्ला अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकन मतदारांना दिला आहे. मतदारांनी एक होऊन पुन्हा डेमॉक्रेट्‌सना विजयी करावे असे त्यांनी म्हटले आहे. दहशतवादाचे राजकारण देशासाठी विभाजनकारी असल्याचा आरोप बराक ओबामा यांनी केला. रिपब्लिकन्सचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कॅलिफोर्नियाच्या ऑरेंज कंट्रीमधील अनाहेम येथे ते बोलत होते.

बराक ओबामा यांच्या सभेस मोठ्या संख्यने लोक उपस्थित होते. लोकप्रियतेपासून दूर राहण्याच्या अमेरिकेच्या माजी अध्यक्षांच्या परंपरेच्या उलट ओबामा आगामी मध्यावधी निवडणुकांसाठी डेमॉक्रेटिक्‍सची दावेदारी मजबूत करण्यासाठी इलिनॉईस येथे प्रचारास उतरले आहेत. जर आक्रमकता आणि विभाजनवादाला विरोध करायचा असेल तर अधिक समजदारपणा दाखवणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले. ओबामांनी जरी डोनॉल्ड ट्रम्प याचे प्रत्यक्ष नाव घेतले नाहे; त्यांचा रोख कोणावर आहे हे स्पष्ट होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)