दहशतवाद्यांशी संबंधित 10 जणांना उत्तर प्रदेशात अटक

लखनौ – लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित आणि दहशतवाद्यांसाठी अर्थसहाय्य जमा करण्याच्या संशयावरून दहशतवाद प्रतिबंधक पथकाने उत्तर प्रदेशामध्ये 10 जणांना अटक केली आहे. गोरखपूर, लखनौ, प्रतापगड आणि मध्यप्रदेशातील रिवान येथून या 10 जणांना अटक करण्यात आली आहे. हे सर्वजण पाकिस्तानमधून दहशतवादी कारवायांसाठी अर्थसहाय्य जमा करण्याच्या कामात सहभागी होते, असे “एटीएस’चे महानिरीक्षक असिम अरुण यांनी पत्रकारांना सांगितले.

नसीम अहमद, नईम अर्शद, संजय सारोज, निराज मिश्रा, साहिल मसिह, उमा प्रताप सिंह, मुकेश प्रसाद, निखील राय उर्फ मुशर्रफ अन्सारी, अंकूर राय आणि दयानंद यादव अशी या अटक केलेल्या व्यक्‍तींची नावे आहेत. “लष्कर ए तोयबा’चा एक म्होरक्‍या या सर्वांच्या संपर्कामध्ये असायचा. त्याने या सर्वांना बनावट नावाने बॅंकेत खाते उघडायला सांगितले होते. प्रत्येक खात्यामध्ये किती पैसे जमा करायचे याच्याही सूचना त्यांना दिल्या गेल्या होत्या. भारतीय एजंटांना या कामी 10 ते 20 टक्के कमिशन म्हणून मिळत असे. आतापर्यंत तब्बल एक कोटी रुपयांइतकी रक्कम या बनावट खात्यांवर जमा करण्यात आली आहे, असेही असिम अरुण यांनी सांगितले.

अटक केलेल्यांचे “लष्कर ए तोयबा’शी संबंध आहेत आणि त्यापैकी काही जणांना आपला उपयोग कोणत्या कामासाठी केला जातो आहे, हे देखील माहित होते. तर हा प्रकार म्हणजे लॉटरीतील गैरव्यवहार आहे, असे काही जण समजत होते. या संदर्भात सविस्तर तपास सुरू असून आणखी काही जणांना अटक केली जाण्याची शक्‍यता आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. या संदर्भात बॅंक अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अटक केलेल्यांकडून “एटीएम’ कार्ड, रोख 42 लाख रुपये. स्वॅप मशिन, मॅग्नेटिक कार्ड रिडर, 3 लॅपटॉप, वेगवेगळ्या बॅंकांची पासबुक, देशी बनावटीचे पिस्तुल आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)