दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रयस्थाने पुरवण्याची कृती अस्वीकारार्ह

अमेरिकेने पाकिस्तानला ठणकावले
नवी दिल्ली – दहशतवादाच्या मुद्‌द्‌यावरून पाकिस्तानबाबत स्वीकारलेला आक्रमक पवित्रा अमेरिकेने कायम ठेवला आहे. दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रयस्थाने उपलब्ध होऊ देण्याची कृती बिल्कूल सहन केली जाणार नाही, असे अमेरिकेने त्या देशाला ठणकावले आहे.

अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रांमधील राजदूत निक्की हॅले यांनी दोन दिवसीय भारत दौरा केला. या दौऱ्यादरम्यान आज येथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी अमेरिकेने पाकिस्तानला स्पष्ट इशारा दिल्याचे सांगितले. याआधी अमेरिका आणि पाकिस्तान या देशांकडे एकमेकांचे विविध क्षेत्रांमधील भागीदार म्हणून पाहिले जात होते. मात्र, दहशतवादाच्या मुद्‌द्‌यावरून अमेरिकेने पाकिस्तानबाबतची भूमिका बदलल्याचे त्यांनी सूचित केले. मुंबईतील महाभयंकर दहशतवादी हल्ल्यांमध्ये भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांनी आपले नागरिक गमावले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दहशतवादामुळे होणाऱ्या यातनांचा अनुभव दोन्ही देशांना आहे. आता दहशतवादविरोधी लढ्यात भारत आणि अमेरिकेने जगाचे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा हॅले यांनी बोलून दाखवली. भारत दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी द्विपक्षीय मुद्‌द्‌यांवर चर्चा केली. भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिक असणाऱ्या हॅले यांच्या दौऱ्याला दोन्ही देशांमधील सहकार्य वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने महत्व आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)