दहशतवाद्यांना निधी पुरावल्याप्रकरणी सईद शाहिद युसुफ विरोधात आरोप पत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सईद सलाउद्दीन याचा मुलगा सईद शाहिद युसुफ विरोधात आरोप पत्र दाखल केले आहे. हे आरोप पत्र २०११ च्या जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना निधी पुरावल्याच्या आरोपाखाली दाखल करण्यात आले आहे.

शाहिद युसुफला  मागील वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात एनआयएने अटक केली होती. युसुफ ४२ वर्षांचा आहे मी शेती क्षेत्रात काम करणारा आहे अशी ओळख त्याने दिली होती. मात्र प्रत्यक्षात तो दहशतवाद्यांना निधी पुरावण्याचे काम करत होता. युसुफचा जामीन अर्ज ७ मार्चला फेटाळण्यात आला. त्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. युसुफ हा हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित आहे असे तपास यंत्रणांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)