दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी सीमेवर खोदले भुयार

बीएसएफकडून जोरदार शोधमोहीम हाती
श्रीनगर – आंतरराष्ट्रीय सीमेच्या (आयबी) लगत खोदण्यात आलेल्या भुयारातूून काही सशस्त्र दहशतवाद्यांनी जम्मू-काश्‍मीरात घुसखोरी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संबंधित भुयार शोधण्यासाठी भारतीय सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) जोरदार मोहीम हाती घेतली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 मे यादिवशी जम्मू-काश्‍मीरचा दौरा करणार आहेत. त्यांच्या दौऱ्यापूर्वी सीमेलगतच्या भुयारातून पाच दहशतवाद्यांनी कठुआ जिल्ह्यात शिरकाव केल्याच्या माहितीमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. भुयार शोधण्याच्या बीएसएफच्या मोहिमेत अनेक जेसीबी मशिन्स आणि मोठ्या संख्येने जवान सहभागी झाले आहेत. कालच दहशतवाद्यांना घुसखोरी करणे सुलभ व्हावे या उद्देशातून पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचा भंग करून भारतीय हद्दीत मारा केल्याचे स्पष्ट झाले. ते नापाक कृत्य अतिशय गंभीर स्वरूपाचे असल्याचे बीएसएफने म्हटले होते. यापार्श्‍वभूमीवर, बीएसएफच्या मोहिमेची माहिती पुढे आली आहे.

बीएसएफ आणि लष्कराच्या जवानांनी 2012 पासून भारत-पाकिस्तान सीमेलगत जम्मू विभागात सहा भुयारे शोधली. पाकिस्तानातून जम्मू-काश्‍मीरात दहशतवादी घुसवण्यासाठी त्या भुयारांचा वापर केला जात असल्याचे उघड झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)