दहशतवाद्यांची भरती करणाऱ्याला यूएईमध्ये अटक

मुंबई – दहशतवाद्यांची भरती करणाऱ्या फारूक देवडीवाला याला संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) अटक करण्यात आली आहे. त्याला भारतात पाठवले जाण्याची शक्‍यता आहे. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याचा निकटचा साथीदार छोटा शकील याच्याशी लागेबांधे असल्याचा संशय असणारा फारूक मुंबईतील दहशतवादाशी संबंधित प्रकरणांत भारतीय यंत्रणांना हवा आहे.

मुंबई, गुजरात आणि उत्तरप्रदेशात दहशतवादी हल्ल्यांचा कट रचल्याबद्दल मागील आठवड्यात फैझल हसन मिर्झा या संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली. त्याचा फारूक हा दूरचा नातलग आहे. फारूकनेच फैझलला दहशतवादाच्या मार्गावर नेल्याचे स्पष्ट झाले आहे. फारूकने फैझलला दहशतवादाचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाकिस्तानात पाठवले. मुंबईत परतल्यावर फैझल दहशतवादी हल्ले घडवण्याबाबत म्होरक्‍यांकडून आदेश येण्याची प्रतीक्षा करत होता. मात्र, त्याआधीच त्याला मुंबईत पकडण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)