दहशतवादी रेल्वे “हायजॅक’ करतात तेव्हा…!

पिंपरी – गर्दीचा फायदा घेत दहशतवादी लोकलमध्ये घुसले…, त्यांनी रेल्वे हायजॅक करत नागरिकांना ओलीस ठेवले…, अन्‌ सुरक्षा यंत्रणांनी नागरिकांची सुटका करत लष्करी जवानांनी दहशतवाद्यांना जेरबंद केले… हा सारा थरार “याची देही याची डोळा’ नागरिकांनी चिंचवड रेल्वेस्थानकावर अनुभवला. निमित्त होते “मॉक ड्रील’चे. अनुभवता आला.

चिंचवड रेल्वे स्थानकावर मंगळवारी (दि. 29) दुपारी दीडच्या सुमारास मॉकड्रील घेण्यात आले. यावेळी रेल्वे पोलिसांना कॉल आला की काही दहशतवादी हे चिंचवड रेल्वे स्थानकावरील लोकलमध्ये घुसले आहेत. त्यांनी रेल्वे त्यांच्या ताब्यात घेतली आहे. मग काय अवघ्या काही मिनीटांत 15 ते 20 जवानांनी हातात रायफल घेत संपूर्ण रेल्वे गाडीला वेढा घातला. यावेळी श्‍वानपथक, बॉम्ब शोधक पथक, अग्निशामक दल, रुग्णवाहिका अशा सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

घटनास्थळी फायरिंगचे आवाज सुरु झाले. रेल्वे पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले तर एकाला जिवंत पकडले. सारा प्रकार पाहून नागरिक काही काळ गोंधळले. मात्र हे मॉकड्रील असल्याचे सांगताच साऱ्यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. यावेळी उपस्थित जवानांनी मॉकड्रीलचे कारण सांगत नागरिकांनाही अशावेळी कोणती काळजी घ्यावी, जवानांना कसे सहकार्य करावे याबाबत माहिती दिली.

रेल्वे महाव्यवस्थापकांची भेट
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी चिंचवड रेल्वे स्थानकाला भेट देत प्रवाशांशी संवाद साधला. यावेळी चिंचवड प्रवासी संघाने डी. के. शर्मा यांना मागण्यांचे निवेदन दिले. संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, सल्लागार ऍड. अरविंद सावंत, नारायण भोसले, शरद चव्हाण, डॉ. पौर्णिमा कदम, रमेश भामरे, सुधीर साहनी, तात्या उर्फ जयकुमार मंजूगडे, जॉनी फ्रान्सीस, अनंत रामन, रेल्वेचे मुख्य वाणिज्य प्रबंधक मिलिंद देऊस्कर, वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक कृष्णाथ पाटील, पुणे मल्याळी फेडरेशनचे अध्यक्ष के. हरीनारायण आदी उपस्थित होते. चिंचवड येथे विविध एक्‍सप्रेस गाड्यांना थांबा, सिंहगड एक्‍सप्रेसला पिंपरी, चिंचवडसाठी स्वतंत्र बोगी, चिंचवड येथे एक्‍सलेटर किंवा लिफ्ट बसविणे, एक्‍सप्रेस गाड्यांसाठी इलेक्‍ट्रॉनिक कोच फलक लावण्यात यावे, विद्यार्थ्यांसाठी मासिक व त्रैमासिक पास पुस्तिका चिंचवड येथे उपलब्ध व्हावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)