दहशतवादी भरतीच्या नेटवर्कचा काश्‍मीरमध्ये पर्दाफाश

श्रीनगर – जम्मू-काश्‍मीरमध्ये आज सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांची भरती करणाऱ्या नेटवर्कचा पर्दाफाश केला. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली. त्यात जैश-ए-महमंद या दहशतवादी संघटनेच्या एका सदस्याचा समावेश आहे. दहशतवादामध्ये सामील होण्यासाठी युवकांना भडकावणारी एक टोळी अस्तित्वात असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली.

त्याआधारे पोलीस, सीआरपीएफ आणि लष्कराने संयुक्त मोहीम राबवून पुलवामा जिल्ह्याच्या त्राल भागात सहा जणांना पकडले. गुलाम नबी शाह, इशफाक समीर शेख, इरफान अहमद मिर, ऐजाझ अहमद भट, बशीर अहमद शेख आणि जुनैद रशिद भट अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्राल भागात दहशतवाद्यांच्या मदतीसाठी ते सक्रिय असल्याची माहिती मिळाली. त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)