दहशतवादी गटाला शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्यास एनआयएकडून अटक 

नवी दिल्ली – नुकत्याच उघडकीस आलेल्या दहशतवादी गटाला शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्याला तरूणाला उत्तरप्रदेशात अटक करण्यात आली. मोहम्मद नईम (वय 21) असे त्याचे नाव आहे. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) पथकाने गुरूवारी रात्री नईमला मेरठमध्ये पकडले. त्याला शुक्रवारी दिल्लीतील न्यायालयात हजर करण्यात आले.

न्यायालयाने त्याला दहा दिवसांची एनआयए कोठडी सुनावली. एनआयएने मागील आठवड्यात इसिसमुळे प्रेरित झालेला हरकत-उल्‌-हर्ब-ए-इस्लाम हा नवा दहशतवादी गट उघडकीस आणला. त्या गटाच्या 10 सदस्यांना अटक करण्यात आली. सरकारी आस्थापना आणि राजकीय नेत्यांना लक्ष्य करून आत्मघाती हल्ले घडवण्याचा कट त्या गटाने रचल्याचे स्पष्ट झाले. त्या गटाकडे देशी बनावटीचा रॉकेट लॉंचर आणि आत्मघाती हल्ल्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या जाकिटांसाठीची सामग्री सापडली. ती सामग्री नईमनेच पुरवल्याचा संशय आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)