अमेरिकी परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानला खडसावले
इस्लामाबाद – पाकिस्तानी भूमीतून सक्रिय असणाऱ्या दहशतवादी गटांना नेस्तनाबूत करण्यासाठी आणखी पाऊले उचलावीत, अशा शब्दांत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी त्या देशाला खडसावले.

प्रथमच पाकिस्तानचा दौरा करणाऱ्या पॉम्पिओ यांनी बुधवारी त्या देशाचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी दहशतवादाला आळा घालण्यासाठी खान यांनी अधिक कृती करण्याची गरज अधोरेखित केली. या भेटीवेळी पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा आणि परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी उपस्थित होते.

दहशतवादी गटांवर पाकिस्तान पुरेशी कारवाई करत नसल्यावरून अमेरिकेने आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. त्यावरून अमेरिकेने अलिकडेच पाकिस्तानला दिली जाणारी 30 कोटी डॉलर्सची लष्करी मदत रद्द केली. त्यानंतर दोन्ही देशांदरम्यान झालेल्या पहिल्याच उच्चस्तरीय भेटीत अमेरिकेची दहशतवादाबाबतची कठोर भूमिका अधोरेखित झाली. मागील काही काळापासून दहशतवादाच्या मुद्‌द्‌यावरून अमेरिका आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत.

हे संबंध सुधारण्याच्या दृष्टीने पॉम्पिओ यांच्या दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे. अर्थात, दहशतवादी गटांविरोधात पाकिस्तानला प्रामाणिकपणे पाऊले उचलावी लागणार असल्याचे त्यांच्या या दौऱ्याने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)