दहशतवादविरोधी लढ्यात अमेरिका भारतासोबत – डोनाल्ड ट्रम्प 

नवी दिल्ली – दहशतवाद्यांविरुद्धच्या लढ्यात भारताला आता अमेरिकेची साथ मिळाली आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दहशतवादाविरोधातील  लढ्यात भारतासोबत उभे असल्याच्या भावना अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवरून व्यक्त केल्या. अमेरिकेचे हे वक्तव्य भारतासाठी महत्वपूर्ण आहे.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले कि, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या दशपूर्तीनिमित्त न्यायासाठी अमेरिका भारतीयांसोबत आहे. या हल्ल्यामध्ये अमेरिकन नागरिकांसोबत १६६ निर्दोष लोकांचे प्राण गेले होते. आम्ही कधीही दहशतवादाला जिंकू किंवा जिंकण्याच्या जवळ जाऊ देणार नाही, असे ट्विट त्यांनी केले.

-Ads-

दरम्यान, सोमवारी अमेरिकेने २६/११ च्या हल्ल्यातील दोषींची माहिती देणाऱ्यांना ५० दक्षलक्ष डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)