दस्त नोंदणीला इंटरनेटचा खोडा

खेड येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील स्थिती

राजगुरुनगर- येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील विस्कळीत इंटरनेट सेवेमुळे नागरिकांना दस्त नोंदणी करण्यासाठी मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच या कामासाठी नागरिकांना दिवसभर ताटकळत थांबावे लागत आहे.
राजगुरुनगर व चाकण येथे वाढत्या शहरीकरणामुळे तसेच औद्योगिकरणामुळे जमिन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे दस्तनोंदणीच्या कामात दिवसांगणिक वाढ होत आहे. मात्र, त्याप्रमाणात मात्र कार्यालय सुविधांच्या बाबतीत कमी पडत आहे. पक्षकार वकील यांची दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात मोठी गर्दी होत असते. या दस्तनोंदणीतून शासनाला मोठ्या प्रमाणावर महसूल देखील मिळत आहे.
गेल्या दहा दिवसांपासून चाकण आणि खेड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात इंटरनेटचे सर्व्हर योग्य पद्धतीने चालत नसल्याने तसेच स्पीडही मिळत नसल्याने दस्तनोंदणीला मोठा विलंब होत आहे. या प्रकारामुळे नागरिक, वकील व पक्षकार यांचे हाल होत असून त्यांना दिवसभर ताटकळत कार्यालयाच्या परिसरातच थांबावे लागत आहे. त्यादिवशी दस्त नोंदणी झाली नाही तर पुन्हा दुसऱ्या दिवशी हेलपाटे मारून या कामासाठी दिवस घालवून नागरिकांना दस्तनोंदणी कार्यालयात यावे लागत आहे.

  • त्रासात आणखीन भर
    खेड येथील दस्त नोंदणी कार्यालयात नागरिकांना बैठकीसाठी पुरेशी व्यवस्था नाही, मोकळी हवा नाही, तसेच स्वच्छतागृहाची व्यवस्थाही नाही. त्यामुळे नागरिकांच्या त्रासात आणखीनच भर पडते.
  • “गुगल क्‍लाऊड’वरून नोंदणीची मागणी
    नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी शासनाने गुगल क्‍लाऊड या साइटवरून दस्त नोंदणी करण्यास सुरुवात केली, तर दिवसाला 60 ते 70 दस्तांची नोंदणी होऊ शकते. त्यामुळे शासनाने या साइटवरून दस्त नोंदणी करावी, अशी मागणी ऍड. सदीप भोसले यांनी केली आहे.
  • गेल्या आठवडाभरापासून तांत्रिक अडचणींमुळे सर्व इंटरनेटसेवेमध्ये खंड पडत असून त्याला योग्य ते स्पीड मिळत नसल्यामुळे नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय होत आहे. याबाबत आम्ही वरिष्ठ कार्यालयास कळविले असून लवकरच दुरुस्ती होऊन ,आम्ही नागरिकांना दर्जेदार चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तसेच सध्या दस्त नोंदणीसाठी जो वेळ लागत आहे तो पाहता तांत्रिक अडचणीमुळे होणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी माझ्यासह सर्व कर्मचारी अतिरिक्‍त एक तास थांबून काम पूर्ण करण्यावर लक्ष देत आहोत. लवकरच तांत्रिक दोष दूर होऊन आम्ही नागरिकांना योग्य ती सुविधा देण्यात येईल.
    – सुनील कोरडे, दुय्यम निबंधक, राजगुरूनगर

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)