दसॉल्टच्या कागदपत्रांनुसार राफेल करारासाठी रिलायन्स अनिवार्य

नवी दिल्ली – दसॉल्ट एव्हिएशन कंपनीच्या अंतर्गत कागदपत्रांचा आधार घेत राफेल करारासाठी रिलायन्स डिफेन्स अनिवार्य असल्याचा दावा एका फ्रेंच नियतकालिकाने केल्याचे वृत्त एका इंग्रजी वाहिनीने दिले आहे. त्यामुळे राफेलवरून भारतात घोंघावत असलेले राजकीय वादळ आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

मीडियापार्ट नावाच्या नियतकालिकाने दसॉल्टच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 59 हजार कोटी रूपयांच्या करारात बाजी मारण्यासाठी रिलायन्सची भागीदारी अनिवार्य असल्याचे इतर कर्मचाऱ्यांना सांगितल्याचे म्हटले आहे. फ्रान्सशी केलेल्या करारानुसार भारत 36 लढाऊ जातीची राफेल विमाने घेणार आहे. त्या विमानांच्या निर्मितीची जबाबदारी दसॉल्टवर आहे. तो करार म्हणजे मोठाच घोटाळा असल्याचा आरोप करत विरोधकांनी मोदी सरकारला घेरले आहे. अशातच काही दिवसांपूर्वी फ्रान्सचे माजी अध्यक्ष ओलांद यांनी भारत सरकारने रिलायन्सच्या नावाचा प्रस्ताव दिल्याने आमच्यापुढे पर्याय उरला नाही, असे म्हटले होते. त्यामुळे मोदी सरकारवर निशाणा साधण्यासाठी विरोधकांच्या हाती नवा दारूगोळा आला. आता दसॉल्टशी संबंधित वृत्तामुळे विरोधकांना आणखी बळ मिळण्याची शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)