दसरेनगर परिसरात श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात

नगर-  सालाबादप्रमाणे दसरेनगर येथे स्वराज प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी प्रभू रामचंद्रांना महाभिषेक, हरी ओम महिला भजनी मंडळाच्या वतीने जन्मोत्सव व पाळणा गीताचा कार्यकम प्रभू श्रीरामचंद्र जन्म अभंग व जन्मसोहळा औक्षण व आरती प्रभू श्रीराम मूर्ती पालखी मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी नगरसेविका रूपाली वारे, वर्षा नरवडे, अंजली शहाणे, संध्या वाणे, सुनीता आव्हाड, किशोर वाणे, कृष्णा नरवडे, अजित शहाणे, संतोष पेंटा, नागवडे, महादेव साबळे, तुकाराम मिसाळ, निखिल वारे आदींसह भक्तगण उपस्थित होते.
पालखी सोहळ्याने परिसरातील वातावरण प्रसन्न झाले होते. गुलाबनगर, छत्रपती कॉलनी, नित्यसेवा हौसिंग सोसायटी, संदेशनगर, पिंपळे वस्ती, बायजाबाई सोसायटी, तवलेनगर, वसंत टेकडी परिसरातून प्रभू रामचंद्राची पालखी काढण्यात आली.
प्रभू रामचंद्रांनी दिलेले विचारांची आज समाजाला गरज आहे. खऱ्या अर्थाने समाज घडविण्याचे काम त्यांनी केले. माता-पित्यांची सेवा, बंधूभाव कसा असावा, हे त्यांनी दाखवून दिले आहे. याचाच आदर्श घेत स्वराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून शांततेचा व स्वच्छतेचा संदेश, जातीय सलोख्याचा संदेश देत पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती अजित शहाणे यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)