दसरा मेळाव्याच्या दिवशी श्री संत भगवानबाबा यांच्या मूर्तीची ना. पंकजा मुंडे यांच्या हस्ते स्थापना

लोकनेत्याच्या मुलीसाठी एक दिवस देण्याचा संकल्प
नगर – कै. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी भगवान गडावर दसरा मेळाव्याचे आयोजन मोठ्या थाटामाटात करत होते आणि भगवानबाबांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी येत होतो. मागील वर्षीपासून ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी सावरगाव येथे दसरा मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी श्री संत भगवानबाबांच्या या जन्मस्थळी त्यांचे स्मारक उभे करण्याचे ठरवले होते. त्यांनी तो संकल्प या दसरा मेळाव्याला पूर्ण होत आहे. 25 फुटी असा श्री संत भगवान बाबा यांची पाण्यावरील भव्य मूर्ती शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी बनवला आहे. लोकनेत्याच्या लेकीसाठी आपण सर्वांनी एक दिवस दिला पाहिजे, असे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी सांगितले.
श्री संत भगवानबाबा यांचा दसरा मेळाव्यानिमित्त सावरगाव येथे मूर्ती बसवून स्मारकाचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. या संदर्भात नियोजन बैठकीत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड बोलत होते.
यावेळी जिल्हा सरचिटणीस अरुण मुंडे, मोहन पालवे, बाबासाहेब सानप, संजय आव्हाड, दीपक खेडकर, सतीश पालवे, राहुल सांगळे, बंटी डापसे, ऍड. युवराज पोटे, प्रवीण सानप, गणेश कर्हाड, कचरू चोभे, अशोक खाडे, महादेव दराडे, अहिल्या दराडे, सुभाष गिते, सुधीर पोटे, संकेत डोळे, राहुल सांगळे, राहुल कारखिले, बाबासाहेब ढाकणे, सतीश पालवे, संजय किर्तने, भीमाजी पालवे आदी उपस्थित होते. या बैठकीस जिल्हाभरातून पदाधिकारी उपस्थित होते.
सरचिटणीस अरुण मुंडे म्हणाले की, कै. गोपीनाथ मुंडे यांनी वंचित व ऊसतोडी कामगारांना एकत्रित करून त्यांच्या प्रश्‍नासाठी देशभर व राज्यभर लढा उभारला. त्यांना त्यांचा न्याय, हक्क मिळवून दिला. त्यांनी जो संघर्ष केला तो संघर्ष पंकजाताई मुंडे करीत आहेत. सावरगाव येथे श्री संत भगवानबाबांचे स्मारक त्यांच्या संकल्पनेतून दसर्याला उभे राहात आहे. नगर शहरातून भगवान बाबांच्या मूर्तीची धार्मिक पद्धतीने रथातून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे. गावोगावी या मिरवणुकीचे ठिकठिकाणी भव्य दिव्य असे स्वागत केले जाणार आहे. दसर्याच्या मेळाव्याच्या दिवशी मूर्तीची स्थापना होईल, असे सांगितले.
मिरवणुकीत दानपेटी ठेवण्यात येणार आहे. भाविकांनी मोठ्या प्रमाणात मदत करावी, असे आवाहन उपस्थितांनी यावेळी केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)