दसरा मेळावा राजकीय नाही- केंद्रे

मेळाव्याला राज्यातून सात लाख भाविक येणार
पाथर्डी –“बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी’ या संकल्पनेतून संत भगवानबाबांचे देशात एक नंबरचे स्मारक बाबाच्या जन्मगावी सावरगाव घाट येथे उभारले जात आहे. भगवानबाबांची पाण्यावर बसवलेली मूर्ती असलेल्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा व दसरा मेळावा ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. दसरा मेळावा राजकीय नाही. यामध्ये कुठलेही गट-तट किंवा जातीभेद नाहीत. सर्वच जाती-धर्माचे लोक भगवानबाबांवर प्रेम करत होते. त्यामुळे किमान सात लाख भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज माजी आमदार गोविंद केंद्रे यांनी व्यक्‍त केला.
दसरा मेळाव्याच्या नियोजनासाठी कृती समितीची बैठक माजी आ. केंद्रे यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीला नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ खेडकर, भाजप सरचिटणीस राहुल कारखेले, मुकुंद गर्जे, माजी नगराध्यक्ष दिनकरराव पालवे, सरपंच संजय बडे, बाळासाहेब ढाकणे, डॉ. ज्ञानेश्वर दराडे, सतीश पालवे, नागनाथ गर्जे, नितीन कीर्तने, वामन कीर्तने, संजय कीर्तने, रामहरी खेडकर, धनंजय बडे, युसुफ शेख, नवाब शेख आदी उपस्थित होते.
दसरा मेळाव्याला जाण्यासाठी पाथर्डी येथे आदल्या दिवशी मुक्कामी येणाऱ्या समाज बांधवाच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे यांनी स्वीकारली. यावेळी कृती समितीच्या सदस्यांनी गावोगाव जावून भाविकांना दसरा मेळाव्याचे निमंत्रण देण्याचा निर्णय घेण्यात आला. पाथर्डी तालुक्‍यातून एक लाख समाज बांधव दसरा मेळाव्याला उपस्थित राहतील,असा संकल्प करून सर्वांनीच प्रचार-प्रसारावर भर देण्याचा घेण्याचा निर्णय झाला.पाथर्डीतील सर्वच कार्यकर्ते एकत्रित निघून मेळाव्याला एकत्रित पोहोचणार आहेत. निघण्याची वेळ, जाण्याची व्यवस्था एकत्रित जमण्याचे ठिकाण, याबाबत गावोगाव निरोप देण्याबाबत सविस्तर चर्चा नियोजन बैठकीत झाली.
केंद्रे म्हणाले, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी भगवानगड विकसित करून देशात पोहोचविला व दसरा मेळाव्याला सर्व समाज बांधवांना एकत्रित जमण्याची परंपरा सुरू केली. सर्व जाती धर्माचे लोक या निमित्ताने एकत्रित येत होते. विशेष करून ऊस तोडणी कामगार या ठिकाणी एकत्रित येऊन दसऱ्याला पूजा करून ऊस तोडणीसाठी जात होते. दुर्दैवाने गडाला गालबोट लागल्याने व कुणाच्या तरी हस्तक्षेपाने 36 वर्षाची लाखो लोक एकत्रित येण्याची परंपरा मोडीत निघाली. ही परंपरा कुणामुळे व कशामुळे खंडित झाली.हे सर्वांनाच माहीत आहे.भगवानबाबांच्या जन्मगावी ही परंपरा अखंडितपणे सुरु ठेवण्याचा निर्णय पंकजा मुंडे यांनी घेतला. गेल्या वर्षीपासून सावरगाव घाट येथे सुरू झालेल्या दसरा मेळाव्याच्या परंपरेला लाखो लोकांनी उदंड प्रतिसाद दिला. याच मेळाव्यात ना.मुंडे यांनी या ठिकाणी भगवानबाबांचे स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. घोषणा केल्याप्रमाणे देशातील एक नंबरचे स्मारक उभारण्याचे काम सुरू आहे. स्व.मुंडे यांनी मला गडावरून पंकजा दिसते असे म्हणून आपला वारस जाहीर केलेला आहे. महत्त्वकांक्षा हे माणसातील जिवंतपणाचे लक्षण असले तरी नेता व्हायला ताकत लागते, काम करण्याची क्षमता लागते, श्रद्धा लागते, लोकांविषयी प्रेम लागते आणि ते सर्व गुण ना.मुंडे यांच्यात आहेत. त्या समाजासाठी काम करायला तयार आहेत. त्यांच्या मागे जनमानसाची ताकत आहे. समाज त्यांना मानतो. त्यामुळे आपण सर्वजण त्यांच्या मागे उभे राहण्यासाठी सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केंद्रे यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)