दशरथ कांबळेंची अध्यक्षपदी बिनविरोध निवड

कुडाळ ः दशरथ कांबळे यांच्या सत्कारप्रसंगी बौद्ध महासभा जावलीचे पदाधिकारी.

कुडाळ, दि. 28 (प्रतिनिधी) – कुडाळ तालुका जावळी येथील दशरथ कांबळे यांनी भारतीय बौद्ध महासभा जावली अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्याचप्रमाणे सचिवपदी संतोष चव्हाण यांची निवड झाली आहे. मेढा येथे आयोजित आरपीआयच्या पदाधिकारी विशेष बैठकीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. यावेळी तालुक्‍यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी दशरथ कांबळे म्हणाले, तालुक्‍यातील दुर्बल घटकासाठी मी सदैव कार्यरत राहणार आहे. तालुक्‍यात महासभेची गाव तिथ शाखा उभारणार आहे. यावेळी भा.बौ .महासभा जिल्हा अध्यक्ष धिरज जाधव, आर.पी.आय.जावली अध्यक्ष एकनाथ रोकडे व जावलीतील कार्यकर्त उपस्थित होते.
कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – दशरथ कांबळे (कुडाळ)- अध्यक्ष, संतोष चव्हाण (केळघर) – महासचिव, चंद्रकांत जाधव (सर्जापुर) – कोषाध्यक्ष, बापू परिहार (बिभवी), अशोक जाधव (आखाड़े), भीमराव गायकवाड़ (इंदवली), निशांत रोकडे (बेलावडे), सूर्यकांत कांबळे (दरे), अनिल शिंदे (हुमगाव), प्रमोद कांबळे (करंदोशी), आबा कांबळे (वहागाव), सखाराम कांबळे (सावली), संदीप माने (कुसुंबी), सुहास परिहार, मंगेश चव्हाण (केळघर), स्वप्निल बगाडे (रायगाव) यावेळी यांच्या निवडी करण्यात आल्या असल्याची माहिती दशरत कांबळे यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)