“दलितांची सफाई’ हेच पंतप्रधानांचे लक्ष्य – राहुल गांधी

नवी दिल्ली – देशातील दलित आणि मागास लोकांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुळीच आस्था नाही. त्यांच्या विकासात दलितांना स्थान नसून दलितांची सफाई करणे हेच त्यांचे मुख्य धोरण आहे, अशी खरमरीत टीका कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.

जंतरमंतर येथे ऍट्रॉसिटी विधेयकासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची राहुल गांधी यांनी दिल्लीत भेट घेतली. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कडाडून टीका केली. या ठिकाणी असलेल्या आंदोलनात त्यांनी आंदोलकांची भेट घेत आपली भूमिका मांडली. त्यांच्यासोबत डाव्या विचारांचे नेते सीताराम येचुरीही उपस्थित होते.

राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी दलित विरोधी आहेत. कॉंग्रेसने कायम एससी/एसटी ऍक्‍टच्या रक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली आहे. यापुढेही ही भूमिका कायम राहिल, असेही त्यांनी स्पष्ट केले. देशातल्या ज्या राज्यांमध्ये भाजपाचे सरकार आहे. त्या-त्या राज्यात दलितांवर हल्ले होत आहेत, अत्याचार होत आहेत, असाही आरोप त्यांनी केला.
मोदी सरकारने सरकारी कामांतही पेचप्रसंग निर्माण केले आहेत. यामध्ये भ्रष्टाचार, आर्थिक अपयश, अकार्यक्षमता तसेच समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रकार उच्च स्तरावर पोहोचले आहेत.

त्यामुळे देशातील जनतेला मोदींच्या बोगस घोषणांच्या अच्छे दिनपासून मुक्त करण्यासाठी आपल्याला कठोर मेहनत करावी लागेल, असेही म्हटले. तसेच मोदींचे धोरण दलितविरोधी असल्याची टीका केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)