दलाईलामा नावाची संस्था आता राजकीयदृष्ट्या अव्यवहार्य

पणजी – दलाई लामा नावाची व्यवस्था किंवा संस्था आता राजकीयदृष्ट्या व्यवहार्य राहिलेली नाही. त्यामुळे ती व्यवस्था कायम ठेवायची की नाही याचा निर्णय तिबेटी लोकांनी घेतला पाहिजे अशी सुचना स्वत: दलाई लामा यांनीच केली आहे. ते म्हणाले की दलाई लामा नावाच्या व्यवस्थेविषयी माझ्या पेक्षा आता चीनलाच अधिक चिंता आहे कारण त्या मागे राजकीय कारणे आहेत असे मतही त्यांनी नोंदवले आहे. तिबेटी लोकांच्या धार्मिक नेत्याला दलाईलामा असे नाव दिले जाते. तिबेटी बुद्धांमधील सर्वात प्रभावशाली आणि महत्वाच्या भिख्खुला हा मान दिला जातो.

गोवा इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटमधील एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की आता तिबेटी बौद्धांनी यापुढे दलाईलामा नावाची व्यवस्था कायम ठेवायची की नाहीं याचा विचार केला पाहिजे असे विधान मी सर्वात पहिल्यांदा 1969 मध्ये केले होंते. तिबेट मध्ये बौद्धांवर तेथील चीन सरकारने अत्याचार सुरू केल्यानंतर दलाईलामा हे 1959 साली तिबेट मधून भारतात आश्रयला आले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

2001 पर्यंत त्यांनी दलाईलामा म्हणून या निर्वासित तिबेटी बौद्धांचे राजकीय व धार्मिक नेतृत्व केले. पण त्यानंतर त्यांनी या नेतृत्वासाठी अन्य राजकीय व्यवस्था केली. सन 2011 पासून आपण पुर्ण राजकीय निवृत्ती घेतली आहे असे त्यांनी नमूद केले. आता आपण नियुक्त केलेल्या राजकीय व्यवस्थेकडे या समाजाचे नेतृत्व आहे. त्यामुळे आता दलाईलामा नावाची राजकीय व्यवस्थाच व्यवहार्य ठरलेली नाही.

ते म्हणाले की तिबेट मधील सर्व धार्मिक नेत्यांची दरवर्षी बैठक होते. त्यानुसार गेल्यावर्षी नोव्हेंबर मध्ये झालेल्या बैठकीत असे ठरले की मी 90 वर्षांचा होई पर्यंत दलाईलामा नावाची व्यवस्था अस्त्विात राहील आणि त्यानंतर ही व्यवस्था कायम ठेवायची की नाही यावर निर्णय घेतला जाईल. सध्या ते 83 वर्षांचे आहेत. यावेळी बोलताना त्यांनी आपली या पदावर नियुक्ती कशी झाली यावरही प्रकाश टाकला. आपल्याला मागच्या जन्माच्या काही स्मृती लहानवयातच आठवल्या होत्या अशी माहिती त्यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)