दर 20 मिनिटांनी धावणार मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन

मुंबई : मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन गर्दीच्या वेळेमध्ये दर 20 मिनिटांनी धावणार आहे. नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अचल खरे यांनी याबाबत माहिती दिली. गर्दीच्या वेळेस या मार्गावर तीन बुलेट ट्रेन धावतील तर उर्वरित वेळेमध्ये दोन ट्रेन धावण्याचा प्रस्ताव आहे. ताशी 320 किलोमीटर वेगाने धावणारी बुलेट साधारण दोन तासात मुंबई-अहमदाबाद हे अंतर पार करेल  असे त्यांनी यावेळी म्हटले.

सध्याच्या सामान्य ट्रेनने हे अंतर पार करण्यास 7 तास तर विमानाने एक तास वेळ लागतो. बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबाद मार्गावर रोज 70 फे-या मारेल. गर्दीच्या वेळी (सकाळी 7 ते 10 आणि संध्याकाळी 5 ते 9 पर्यंत) तीन बुलेट ट्रेन धावतील असा प्रस्ताव आहे, तर गर्दी नसताना दोन बुलेट ट्रेन धावतील असे खरे म्हणाले. या मार्गावर 12 स्थानके असतील – बीकेसी, ठाणे, विरार, बोइसर, वापी, बिलीमोरा, सूरत, भरूच, बडोदा, आणंद, साबरमती आणि अहमदाबाद असे स्थानके असणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)