दर नियंत्रणासाठी कारखान्यांकडील साखरेच्या साठ्यावर नियंत्रण

केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली – सणासुदीच्या काळात साखरेच्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकराने आगामी दोन महिन्याच्या काळाकरीता साखर कारखान्यांना साखरेच्या साठ्यांवर नियंत्रण लागू केले आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत साखरेचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे साखरेच्या िंकंमती वाढण्याची शक्‍यता वर्तवण्यात आल्याने त्याचा गैरफायदा घेण्यासाठी साखर कारखान्यांनी साठेबाजी करू नये म्हणून ही साठे मर्यादा लागू करण्यात आली आहे.

भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादन करणारा देश आहे. तथापी सन 2016-17 च्या हंगामात केवळ 21 दशलक्ष टन साखरेचे उत्पादन झाले आहे. दर वर्षी साधारणपणे ते 25 दशलक्ष टन इतके साखरेचे उत्पादन होत असते. देशांतर्गत साखरेची गरज 24 ते 25 दशलक्ष टन इतकी असते. या पार्श्‍वभूमीवर ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी या निर्णयाच्या संबंधात ट्‌विटरवरून माहिती देताना सांगितले की आम्ही सप्टेंबर आणि ऑक्‍टोबर या काळात साखर कारखान्यांच्या साठ्यांवर मर्यादा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

मार्केटिंग वर्षातील साखरेच्या उपलब्धतेच्या केवळ आठ टक्‍क्‍यांपर्यंत साखरेचा साठा कारखान्यांनी करावा त्या पेक्षा अधिकचा साठा त्यांना करता येणार नाही असेही पासवान यांनी स्पष्ट केले आहे. सध्या साखरेचा किरकोळ बाजारातील दर 40 रूपये किलो असा आहे आणि ब्रॅंडेड साखरेचा दर 50 रूपये प्रतिकिलो असा आहे. गेल्याच महिन्यात सरकारने साखरेचे दर नियंत्रणात राहावेत म्हणून आयात साखरेवरील आयात शुल्क दहा टक्‍क्‍यांनी वाढवून ते 50 टक्के इतके केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)