दर गुरुवार कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन

बारामती- चिकुनगुणिया, डेंग्यु ताप या रोगांचा प्रसार “एडिस इजिप्ती’ डास चावल्यामुळे होतो. हे डास साठा करून ठेवलेल्या स्वच्छ पाण्यात आढळतात. शहरातील नागरिकांनी चिकुनगुणिया, डेंग्यु ताप या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी दर गुरुवार कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन येथील मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. शहरातील नागरिकांनी दर गुरुवारी आपल्या घरातील सर्व पाणी साठवणुकीची भांडी मोकळी करून कोरडी करून पुन्हा भरावीत. पाणी साठा असणाऱ्या टाक्‍या, फ्रिज, कुलर, कुंड्या आदींमधील पाणी दर सात दिवसांनी बदलावे. घराभोवती पाणी साठणाऱ्या टाकवू वस्तू, पत्र्यांचे डबे, नारळांच्या करवंट्या, रिकामे शहाळे, फुटक्‍या बाटल्या, इत्यादी डास उत्पत्ती स्थाने त्वरीत नष्ट करावीत. नगरपरिषदेमार्फत प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येत आहेत. नागरिकांनी व्यक्तिगत संरक्षणासाठी घरगुती उपाययोजना म्हणून पूर्ण बाह्यांचे कपडे, डास प्रतिबंधक मलम, मच्छरदाण्यांचा वापर करावा. शरीर उघडे राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)