दर्जाहिन औषधांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात

अन्न व औषध प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर कॅगचे ताशेरे


औषधांचा साठा परत घेण्यापूर्वीच बाजारात विकली गेली


दुकानांची तपासणी न करताच 1286 परवान्यांचे केले वाटप

मुंबई – बाजारात औषधाचा साठा येण्यापूर्वी त्याची गुणवत्ता तपासली जाते. मात्र, अन्न व औषध प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे मानांकनानुसार गुणवत्ता नसलेल्या औषधांचा साठा परत घेण्यात विलंब झाल्यामुळे ती विकली गेली आहेत. अशा औषधांचे नागरिकांकडून सेवन झाले असून जनतेला भविष्यात गंभीर आजाराला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता असल्याबद्दल भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग) यांनी कडक ताशेरे ओढले आहेत.

सरकारच्या अखत्यारीत असलेल्या अन्न व औषध प्रशासनाकडून बाजारात नागरीकांसाठी उपलब्ध असलेल्या खाद्यान्न व औषधांची तपासणी करून त्याची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी आहे. मात्र या विभागाने राज्यातील जनतेला औषधे उपलब्ध करून देणाऱ्या विक्रेत्यांची परवान्यांची तपासणी करणे आवश्‍यक आहे. परंतु या विभागाने जवळ 1 हजार 535 औषध विक्रेत्यांच्या परवान्यांची तपासणी केली नाही. तर 1 हजार 286 औषध विक्रेत्यांच्या दुकानाची तपासणी न करताच त्यांना परवान्यांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे या दोन्ही प्रकारच्या औषध विक्रेत्यांकडून चुकीच्या औषधांचा पुरवठा जनतेला होवून जनतेचे आरोग्य धोक्‍यात येण्याची शक्‍यता अधिक असल्याची भीती कॅगने व्यक्त केली आहे.

याशिवाय राज्यातील औषध पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून सिरप, गोळ्या, इंजेक्‍शनसारख्या महत्वाच्या औषधांच्या तपासणीत ती कमी मानांकनाची असल्याचे आढळून येवूनही त्या औषधांचा पुरवठा बाजारात होवून त्याची विक्री झाली. विशेष म्हणजे अशी कमी मानांकनाची औषधांची विक्री केल्याबद्दल या विभागाने संबंधित कंपन्यांवर कोणतीच कारवाई केली नाही की ती उत्पादने मागे घेतली नसल्याने जनतेला भविष्यात गंभीर आजाराला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)