दरोड्यातील चार आरोपींना पोलिसांनी केली अटक

संगमनेर – संगमनेर तालुक्‍यातील आंबी खालसा येथे झालेल्या घरफोड्यांतील चार आरोपींना जेरबंद करण्यात घारगाव पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी अक्षय उंबऱ्या काळे, गिल्या ऊर्फ गुलाब किसन भोसले, संदीप चंद्रकांत भोसले, राहुल चंद्रकांत भोसले यांना सापळा लावून ताब्यात घेण्यात आले.
9 ऑक्‍टोबर रोजी आंबी खालसा परिसरात दहा घरांना लक्ष्य करत चोरट्यांनी तेथून मोठा ऐवज चोरुन नेला होता. यातील मच्छिंद्र कहाणे यांच्या बंद घरासमोरील एक दुचाकी, घरातील रोकड, दागिने असा, एकूण 2 लाख 39 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याचे पुढे आले होते. घारगाव पोलीस ठाण्यात मच्छिंद्र कहाणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील आरोपींचा 9 ऑक्‍टोबर रोजी पहाटे पाठलाग करून त्यांच्या ताब्यातील मोटारसायकल (क्र. एमएच-17 बीएच- 6623) हस्तगत करण्यात आली होती.
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून अक्षय उंबऱ्या काळे (रा. सुरेगाव, ता. श्रीगोंदा), गिल्या ऊर्फ गुलाब किसन भोसले (रा. खरातवाडी, ता. श्रीगोंदा), संदीप चंद्रकांत भोसले, राहुल चंद्रकांत भोसले यांना ताब्यात घेतले. यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांच्याकडून सोन्याचे दागिने व इतर वस्तू जप्त करण्यात आल्या. गुन्हाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली घारगाव पोलीस निरक्षक अंबादास भुसारे करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)