दरोड्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांना अटक

संगमनेर – संगमनेर तालुक्यातील वरंवडी शिवारात चौधरवाडी खरशिंदे रस्त्याच्या कडेला दरोड्याच्या तयारीत दबा धरुन बसलेल्या नऊ दरोडेखोरांपैकी तिघांना पकडण्यात आश्वी पोलिस ठाण्याच्या रात्र गस्ती पथकाला यश आले आहे.

शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास पोलिस उपनिरिक्षक दत्तात्रय उजे, हवालदार एकनाथ बर्वे, अनिल शेंगाळे, संजय मंडलिक व चालक भारत जाधव हे वरंवडी शिवारात चौधरवाडी खरशिंदे रस्त्यावर गस्त घालीत होते. यावेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या लवणात ८ ते ९ जण दबा धरुन बसले असल्याच्या हालचाली त्यांच्या लक्षात आल्या. त्यामुळे पोलिसांनी वाहन थांबवून दिव्यांच्या प्रकाशात पाहिले असता, त्यातील ६ ते ७ जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. मात्र रविंद्र इंगळे ( वय २६ ), सुखदेव वाडेकर ( वय ३५ ) व श्रीकांत उर्फ शिरक्या मुन्तोडे ( वय ३५ ) तिघेही रा. आश्वी खुर्द, ता. संगमनेर यांना पकडण्यात पोलिसांना यश आले.

त्यांची झडती घेतली असता ब्लेड व  मिरची पुड तसेच पांढऱ्या रंगाची १३२ फुटाची सुताची दोरी सापडली. पोलिस उपनिरिक्षक दत्तात्रय उजे यांनी विचारपूस करताना, रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या लोकांना लुटणे व चोरी करण्यासाठी आल्याची कबुली यावेळी आरोपींनी दिली. त्यांच्या साथीदारांपैकी राहुल वाघ, शरद उर्फ गोट्या पर्वत, प्रकाश वाडगे, हर्षद शेख, कोरडे, सर्व राहणार दाढ खुर्द, ता. संगमनेर, संकेत दातीर ( रा. नाशिक) असे ६ जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले असल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)