दरोड्याच्या तयारीतील पाच जणांची टोळी पोलिसांनी पकडली

शेवगाव – दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांची टोळी शेवगाव पोलिसांनी जेरबंद केली. त्यांच्याकडून गावठी कट्टा, गुप्ती, चाकू यासारखे प्राणघातक हत्यारे व सोन्या-चांदीचे दागीने जप्त केले. त्यांना पोलीस कोठडी मिळाल्यानंतर शहरासह तालुक्‍यात विविध ठिकाणी केलेल्या चोरी व दरोड्यात लुटलेले सोन्याचे दागीने शहरातील दोन सराफांना विकल्याची त्यांनी कबुली दिली. मात्र पोलिसांनी अद्याप इतर कोणालाही चौकशीसाठी ताब्यात घेतलेले नाही. त्यामुळे शहरात तर्कवितर्क लावले जात आहेत.

गेल्या दोन ते तीन महिन्याच्या कालावधीत शहरात हरवणे हत्याकांड, आखेगाव रस्त्यावरील तिहेरी हत्याकांड, घरफोड्या तसेच चोरट्यांच्या भीतीने काही दिवसांपूर्वी जयश्री ठाणगे या महिलेचा झालेला मृत्यू, यामुळे नागरिक दहशतीखाली आहेत. विविध घटनांमध्ये पकडलेले आरोपी तेच आहेत का? याबाबत जनतेच्या मनात अजूनही संभ्रम आहे. तर चोरी व घरफोडीच्या गुह्यातील तसेच मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी सापडूनही तसेच त्यांनी कबुली देवूनही ऐवज हस्तगत करण्यात पोलीस टाळाटाळ करत असल्याचे दिसून येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)