दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

एक फरार : पाच जणांकडून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

चाकण- महाळुंगे इंगळे (ता. खेड) येथील पेट्रोल पंप लुटण्याच्या तयारीत असणाऱ्या सहा जणांच्या टोळीला चाकण पोलिसांनी आज (रविवरी) दुपारी सापळा रचून ताब्यात घेतले. त्यापैकी दोन अल्पवयीन असून एक जण फरार होण्यात यशस्वी झाला. तर या पाच जणांकडून दोन लाखांचा मुद्देमाल व 20 ते 25 गुन्हे उघडकीस आले आहेत, अशी माहिती चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली.
पियुष शंकर घाडगे (वय 19), मेहबूब नबीसाब शेख (वय 21, रा. दोघे चाकण, ता. खेड), विनोद अर्जुन अनारसे (वय 19 रा. निघोजे, ता.खेड), दोन अल्पवयीन असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर राहुल बनसोडे (पूण नाव पत्ता माहित नाही) हा फरार होण्यात यशस्वी झाला आहे. चाकण पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चाकण तळेगाव रस्त्यावरील महाळुंगे येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या हेतून सहा जणांची टोळी येणार असल्याची माहिती पोलिसांना गुप्त खबऱ्या मार्फत मिळाल्यानंतर तळेगाव रस्त्यावरील महाळुंगे शिवारामध्ये पोलिसांनी सापळा रचला व या टोळीला ताब्यात घेतले मात्र, यातील एक आरोपी फरार होणार यशस्वी झाला आहे. अटक करण्यात आलेल्या पाच जणांकडून मिरचीपूड, लोखंडी कोयता, चोरीचे तीन मोबाईल, तीन मोटरसायकली असा एकूण 1 लाख 90 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी महाळुंगे येथील मांजरे पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले.
पोलीस उपायुक्त झोन 1 स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत अलसटवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे, पोलीस नाईक कांबळे, जाधव, जरे, सातकर, गोरड, गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल वर्पे यांनी ही कारवाई केली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार करीत आहेत.

  • मिळालेले मोबाईल चोरीचेच
    या टोळीने गेल्या सहा महिन्यांमध्ये चाकण औद्योगिक परिसरांमध्ये येणारे जाणारे ट्रक ड्रायव्हर यांना अडवून त्यांच्याकडून रोख रक्कम व मोबाईल जबरीने करून घेतल्याचे 20 ते 25 प्रकरणे उघडकीस आली असून त्यांच्या ताब्यात मिळालेल्या दोन मोटरसायकली या चोरीच्या असून मिळालेले मोबाईल सुद्धा जबरी चोरीचे असल्याचे उघडकीस आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)