दरोड्याचा डाव उधळला

पिंपरी – सराफ दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीतील भीमराज गंगाराम नाथ (वय 34, रा. साईरंग कॉम्प्लेक्‍स, काटेपुरम चौक, सांगवी. मूळ रा. टीकापूर कैलाली, ज्योतीनगर, जि. टिकापूर, नेपाळ), गिरी ठेबगे सिंग (वय 35, रा. श्री ज्वेलर्स जवळ, काटेपुरम चौक, सांगवी. मूळ रा. शिवडी, चौर पाटी मंगलसेन, नेपाळ), लक्ष्मण भत्ते टमाटा (वय 32), जनक रत्न ढकाल (वय 30, दोघे रा. कल्याण फाटा पनवेल रोड, मुंबई. मूळ रा. कुईने, तातापाने, ता. गुटू, जि. सुरवेत, नेपाळ), रमेश खडक आहुजा (वय 43, रा. रघुनाथ रोड, बांद्रा वेस्ट, मुंबई. मूळ रा. मुसोरिया, जि. गोटी कैलालीया अंशन, नेपाळ) यांना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केली. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन लोखंडी कटावण्या, सॅकबॅग, एक्‍सा ब्लेड कटर, नायलॉन दोरी, स्टीलचा चॉपर, लोखंडी कोयता, कापडी मास्क, कानटोपी असा 1430 रुपये किमतीचा ऐवज मिळून आला. ही कारवाई काटेपुरम चौक, सांगवी येथे मंगळवार दि. 4 ला पहाटे तीनच्या सुमारास झाली.

काटेपुरम चौक, सांगवी येथे श्री ज्वेलर्स हे सराफी दुकान आहे. सर्वजण नर्मदा गार्डन लॉन्स जवळ असलेल्या दावल भंगार सेंटरच्या मागच्या बाजूला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता ते सर्वजण श्री ज्वेलर्स या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे तपास करीत आहेत. दोन दिवसा पूर्वीच चिखली पोलिसांनी यमुनानगर येथील बीयर बारवर दरोडा टाकणाऱ्या पाच जाणांना अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी हा दुसरा दरोड्याचा डाव उधळला, अशी माहिती पोलिसांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)