दरोडा टाकून 13 वर्षे फरार असलेल्या एकाला अटक

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

लोणी काळभोर- दरोड्याचा गुन्हा करून 13 वर्षांपूर्वी फरारी असलेल्या एका आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी सांगितले.
या संदर्भात अधिक माहिती देताना घनवट यांनी सांगितले की, या प्रकरणी लैल्या उर्फ लयल्या सुलाख्या चव्हाण (वय 35, रा. भांबोरा व जलालपूर शिवार, ता. कर्जत, जि. अहमदनगर) याला अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस दप्तरी नोंद असलेले परंतू, फरारी असलेल्या आरोपींना अटक करण्याची सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला केली होती. त्या नुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस पथक या फरारी आरोपींची माहिती घेत होते.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र मांजरे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाला लैल्या चव्हाण हा भांबोरा गावात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या नुसार रविंद्र मांजरे, सहायक फौजदार दत्तात्रय गिरमकर, हवालदार शंकर जम, सुनील जवळे, शरद बांबले, पोलीस मित्र अन्सार कोरबु हे पथक भांबोरा गावात जाऊन थांबले. तेथे सापळा रचून त्याला जेरबंद केले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
सदर लैल्या चव्हाण हा 2006 मध्ये शिक्रापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात तसेच 2013 मध्ये दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या चोरीच्या गुन्ह्यात सामील होता. परंतु, तेंव्हापासून तो फरारी असल्याने त्याला अटक झाली नव्हती. त्याची वैद्यकीय तपासणी करून शिक्रापुर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)