दरोडयातील अट्टल गुन्हेगार जेरबंद

1 लाख 30 हजाराचे सोन्याचे दागिने जप्त

नगर – नगर तालुक्‍यात दरोडयाचे प्रमाण वाढले असून सारोळा कासार शिवारात दि.6 रोजी दरोडा टाकण्यात आला यातील सराईत गुन्हेगारास जेरबंद करण्यात नगर तालुका पोलीसांना यश आले आहे.

याबाबतची माहिती अशी कि, फिर्यादी निलेश सुभाष डुमरे (रा.तळेगाव दाभाडे,पुणे ) यांना स्वस्तात ड्रायफूट देण्याचे अमिष दाखवून त्यांना व त्यांच्या साथीदारांना लुटण्यात आले. त्यांच्या कडील रोख रक्कम व सोन्याचे दागिणे मिळून 3 लाख 34 हजार 800 रूपये लुबाडण्यात आले.

याप्रकरणी मिळालेल्या बातमीनुसार पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा ,पोलीस उप अधिक्षक घनशाम पाटील, पोलीस उपअधिक्षक आनंद भोईटे (नगर ग्रामीण ) यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुक्‍याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या नेतृत्वाखाली सारोळा कासार दरोडयातील अट्टल गुन्हेगार राहुल निवाश्‍या भोसले (रा.सारोळाकासार ता.जि.अ.नगर ) यास पोलीसांनी ताब्यात घेवून त्याच्याकडून दरोडयाच्या गुन्ह्यात चोरलेल्या सोन्याच्या चार अंगठया, सोन्याची एक चेन, असा 52 ग्रॅम सोन्याचा 1 लाख 30 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल आरोपीकडून हस्तगत करण्यात आला आहे. या पथकामध्ये पोलीस उप निरीक्षक नेरकर, पोउपनि महेश क्षिरसागर, पोना.रविंद्र औटी, पोना. साबीर शेख, पोना. आनंद सत्रे, पोकॉ. विनोद पवार , पोकॉ. संदीप जाधव, महिला पो.कॉ.लता पुरणे आदी सहभागी झाले होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)