दरेकर यांना हटविले, तालुकाध्यक्षपदी दुसुंगे ; राष्ट्रवादीत शुद्धीकरणास सुरूवात

फाळकेंच्या हस्ते नियुक्‍तीचे पत्र

नगर: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगर तालुकाध्यक्ष दादा दरेकर यांना तडकाफडकी पदावरून हटविण्यात आले असून त्यांच्या जागी ऍड. उद्धवराव दुसुंगे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नगर शहरात सुरू असलेल्या संघर्षच्या पार्श्‍वभूमिवर दरेकर यांना हटविण्यात आल्याचे बोलले जात असून पक्षात आता शुद्धीकरणाची मोहिम सुरू झाल्याचे सांगण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुसुंगे यांना जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके व कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांचे हस्ते आज नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी प्रदेश चिटणीस अंबादास गारूडकर, माजी महापौर अभिषेक कळमकर, जिल्हा उपाध्यक्ष किसनराव लोटके, सबाजीराव गायकवाड, अजित कदम, युवक तालुकाध्यक्ष मनोज भालसिंग, पारनेर तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, उपसभापती दीपक पवार, मधुकर उचाळे, केशवराव बेरड, सुहास कासार, अशोक बाबर, अब्बास शेख, आबासाहेब सोनवणे उपस्थित होते. यावेळी फाळके म्हणाले, नगर जिल्हा हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. त्या अर्थाने नगर तालुक्‍याला विशेष महत्व आहे. यामुळे पक्षश्रेष्ठींने या तालुक्‍यावर लक्ष केंद्रीत केले आहे. इतर तालुक्‍यांपैकी नगर तालुक्‍याची ओळख वेगळी असून, तालुक्‍याचे क्षेत्रफळ मोठे आहे. सक्षम नेतृत्व करणारा कार्यकर्ता तालुक्‍याला हवा होता. त्या माध्यमातून शरद पवार व पक्षश्रेष्ठींच्या निर्णयानेच दुसुंगे यांची तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)