दरीत कोसळून पर्यटकाचा मृत्यू

महाबळेश्‍वर – महाबळेश्‍वर येथे पर्यटनासाठी नातेवाईकांसोबत गेलेल्या शाहूपुरी येथील विनोद शंकर जाधव (वय 40) यांचा लॉडविक पॉईटच्या कड्यावरुन कोसळल्याने मृत्यू झाला. जाधव यांचा लॉडविक पॉईंटवरुन पाय घसरुन ते सुमारे दीडशे फुट खोल दरीत पडले. दरम्यान, त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

शाहूपुरी येथील विनोद जाधव हे कुटुंबियांसोबत महाबळेश्‍वर येथे पर्यटनासाठी गेले होते. जाधव आणि भोईर हे साडु बंधु आपल्या कुटूंबासह लॉडविक पॉईंट वरील हत्तीचा माथा पाहुन परत येत असताना विनोदने आपला फोटो घेण्याची विनंती नितीनला केली व विनोद हा रेलिंग तुटलेल्या ठिकाणी थांबुन कड्याच्या बाजुला फोटोसाठी पोझ देवुन उभा राहीला. यावेळी गवतावरून विनोद यांचा पाय घसरला आणि ते 150 फुट खोल दरीत कोसळले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी क्षेत्र महाबळेश्‍वर येथील वन व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व स्टॉलधारकांनी पायवाटेने कड्यात खाली उतरत विनोद जेथे कोसळला होता तेथे जावुन विनोद यांना जखमी अवस्थेतच बाहेर काढले. त्यानंतर त्यांना महाबळेश्‍वर येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)