दरवर्षी 5 टक्‍के दमा रुग्णांची भर

शहरी भागात आजार बळावला : शहरीकरण, प्रदूषण कारणीभूत


डॉक्‍टरांची माहिती : लहान मुलांमध्ये प्रमाण सर्वाधिक

पुणे – वाढते शहरीकरण व वाहनांची प्रचंड संख्या आणि त्यातून होणारे प्रदूषण आदी कारणामुळे शहरी भागातील नागरिकांमध्ये दम्याचा फास आवळला जात आहे. हे प्रमाण शहरी भागत वाढत असून दरवर्षी साधारण पाच टक्‍के रुग्णांची वाढ होत असल्याचे निरीक्षण विविध डॉक्‍टरांकडून नोंदविण्यात आले आहे. दरम्यान, याबाबत पुना हॉस्पिटलमधील चेस्ट फिजिशियन डॉ. नितीन अभ्यंकर, इंडियन अकॅडमी ऑफ पेडिऍट्रिक्‍सचे अध्यक्ष डॉ. संजय ललवाणी व सिप्ला लिमिटेडचे मुख्य वैद्यकीय संचालक डॉ. जयदीप गोगटे यांनी ही माहिती दिली.

पुण्यासारख्या शहरात स्थानिक डॉक्‍टरांकडे उपचारासाठी येणाऱ्या 50 टक्‍के रुग्णांमध्ये दम्याची लक्षणे आढळत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. दमा या आजाबाबत अद्याप पुरेशी जागृती नसल्याने तो वाढत जात आहे. योग्य उपचार न मिळाल्याने तो रुग्णांना घातकही ठरत आहे.

यावेळी डॉ. अभ्यंकर म्हणाले, वाढत्या शहरीकरणामुळे दम्याचे रुग्ण वाढत चालले आहेत. शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. वातावरणातील बदल, वाहनांचे प्रदूषण दम्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. दमा व इन्हेलेशन थेरपीबाबत समज बदलणे आवश्‍यक आहे. अनेक रुग्ण इन्हेलेशन थेरपी थांबवितात. त्यामुळे या आजारावर नियंत्रण मिळविणे कठीण जाते.

डॉ. ललवाणी म्हणाले, दम्याच्या एकूण रुग्णांपैकी 50 टक्‍के लहान मुले असतात. पाच वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये दम्याचे प्रमाण अधिक आढळून येते. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरांमध्ये हा आजार अधिक बळावत चालला आहे. समाजामध्ये वावरत असताना इन्हेलरचा वापर करणे, अनेकांना योग्य वाटत नाही. त्याचे व्यसन लागण्याची भीती मनात असते. त्यामुळे या उपचारांकडे रुग्णांकडून दुर्लक्ष होते. तर दम्यासाठी इन्हेलेशन उपचार पध्दतच योग्य असल्याचे डॉ. गोगटे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)