दररोज उचलला जातो दोन टन कचरा

 

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहराच्या विविध भागांत स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेत महापौर राहुल जाधव यांच्यासह स्थानिक नगरसेवक सहभागी होत असून, दररोज दोन टन कचरा उचलला जात असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

क क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने गुरुवारी (दि. 4) मोशी-प्राधिकरणातील राजे शिवाजीनगर येथे राबविण्यात आलेल्या “स्वच्छ ही सेवा’ या मोहिमेत महापौर राहुल जाधव व नगरसदस्या अश्‍विनी जाधव यांनी सहभाग घेतला. यावेळी सुमारे दोन टन कचरा उचलण्यात आला. यामध्ये क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव, सहायक आरोग्य अधिकारी बी. बी. कांबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक आर. एम. भोसले, विजय दवाळे, वैभव कांचनगौडार, अंकुश झिटे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रतिनिधी व विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)