दया हे धर्माचे प्रतिक – भोसले महाराज

शेवगाव – दया हे धर्माचे प्रतिक मानले जाते. भुतदया ज्यांचे वर्तणुकीत ठायी ठायी भरलेली असते त्यांचे बाजुला धर्म म्हणजे पर्यायाने परमेश्‍वर असतो. स्व. चंद्रकांत दादा भालेराव यांचे सतकर्मातून धर्माचाच परिचय होतो असे प्रतिपादन मच्छिंद्र महाराज भोसले यांनी केले.

प्रति माहूरगड म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र अमरापूरच्या श्री. रेणुकामाता देवस्थानचे निर्माते भगवतीभक्त स्व. चंद्रकांत भालेराव यांचे मासिक पिंडदानविधी व स्मृतीस्थळ भुमिपूजन सोहळाप्रसंगी आयोजित किर्तनसेवा सादर करताना ते बोलत होते.

समर्थ हनुमान देवस्थानचे अध्यक्ष रमेशआप्पा महाराज, श्री रेणुकामाता मल्टीस्टेट पतसंस्थेचे चेअरमन प्रशांत भालेराव, शिवसेना नेते रामदास गोल्हार, एकनाथ कुसळकर सरपंच विजय पोटफोडे, कृष्णा महाराज ताठे, काका महाराज मुखेकर, भागवत मरकड, बाळासाहेब चौधरी, रेणुका प्रॉडक्‍शनचे अध्यक्ष योगेश भालेराव, अॅड. नितीन भालेराव पाथर्डीचे नगराध्यक्ष सुभाष घोडके, मंगलताई, जयंती आणि योगीता भालेराव आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

भोसले महाराज म्हणाले, पवित्र आणी पावित्र्य यांचा अनोखा प्रवाही कृती अनुनय ज्यांचे हयातीत व निर्वाणानंतरही जाणवत असतो, त्यांचेच समाधी सोहळे, मासिक पिंडदान व स्मृतीस्थळ उभारली जातात. स्व. भालेराव यांनी पोलीस खात्यात सेवा करूनही आपल्या कोणालाही अंगुलीनिर्देश करू दिला नाही. त्यांची तीनही मुले सुसंस्कारी निघाली, हा त्यांच्या सतधर्माच्या वागणुकीचा परिचय आहे.

रेणुकामाता मल्टीस्टेटचे राजेंद्र नांगरे, अश्‍वलिंग जगनाडे, सुरेश चौधरी, संदीप बोरुडे, बाबा गरड, अनिल बोरुडे, भागचंद खैरे, सदाशिव कळमकर, राहुल वाघमारे, दत्ता कोळगे तुषारदेवा वैद्य, आप्पा कुलकर्णी, श्रीमंत घुले, मदन म्हस्के, चंद्रकांत गायकवाड आदी उपस्थित होते.

अत्याधुनिक रुग्णवाहिका देणार
सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून स्व.चंद्रकांत दादा भालेराव यांचे भावी पिढीला चिरकाल स्मरण रहावे, यासाठी त्यांचे स्मरणार्थ एक अद्यावत रूग्णवाहिकेची व वृद्धाश्रम तसेच वारकरी शिक्षण संस्थेची सुविधा देवस्थानच्या वतीने लवकरच करण्याचा मानस यावेळी प्रशांत भालेराव यांनी व्यक्त केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)