दया भाभीने “तारक मेहता का उल्टा चष्मा’ सोडला

कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चश्‍मा’ मध्ये दिशा दयाबेनची भूमिका साकारत होती. मात्र आता ही सर्वात आवडती आणि लाडकी दया बेन म्हणजेच दिशा वकानीने या मालिकेला अखेर रामराम ठोकला आहे. ती मागच्या दीड वर्षांपासून शोमध्ये दिसत नव्हती. आई झाल्यानंतरच दिशा शोपासून दूर झाली होती. पण तिच्या कमबॅकच्या बातम्या मागच्या वर्षी चर्चेत होत्या. तिला परत आणण्यासाठी निर्माते आणि चॅनेलने खूप प्रयत्न केले. निर्मात्यांनी तिला जास्त पेमेंटचीही ऑफर दिली होती.

पण तिने तरीही परत यायला नकार दिला. असेही समजते आहे की, दिशाने चॅनेलला तिचे कॉन्ट्रॅक्‍टही संपवण्याचे सांगितले आहे. तिने इन्स्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये याबाबतची घोषणा केली आहे. “मी पुन्हा शो मध्ये यावे, असे सगळ्यांनाच वाटते आहे. विशेषतः माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनाच मी पुन्हा शो मध्ये हवी आहे. मलाही शो मध्ये पुन्हा यावेसे वाटते आहे. पण परिस्थिती अनुकूल नाही. त्यामुळे मला आता या शो मध्ये काम करता येणार नाही.’ असे तिने म्हटले आहे. आपल्यालावर केलेल्या प्रेमाबद्दल तिने प्रेक्षकांचे मनापासून अभार मानले आहेत आणि “तारक मेहता का उलटा चष्मा’ बघत राहण्याची विनंतीही केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फायनली प्रोड्यूसर असित मोदींनी दिशाशियावच पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. शोमध्ये लवकरच आणखी दोन पात्रांची एंट्री होणार आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ व्यतिरिक्‍त “खिचडी’ आणि “सीआयडी’मध्येही दिशा दिसली आहे. त्याबरोबरच फिल्म “जोधा-अकबर’, “देवदास’मध्येही दिशाने काम केले आहे. संयोगाने दोन्ही सिनेमांमध्ये ऐश्‍वर्या लीड रोलमध्ये होती. त्यामुळे या सर्व चित्रपट आणि सीरियल्समध्ये दिशाच्या कामाची कुणीही दखल घेतली नव्हती. मयूर पाडिया या गुजरातमधील थिएटर आर्टिस्टबरोबर दिशाचा विवाह झाला आहे. “कमाल पटेल वर्सेस धमाल पटेल’ आणि “लाली लिला’ या नाटकांमधूनही तिने काम केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)