दया, क्षमा, शांतीमुळे घर स्वर्गाप्रमाणे – साध्वी मंजुलज्योतिजी

भोसरी – दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती या वचनाप्रमाणे सर्वांच्या बाबतीत मनात दयाभाव असावा. दया, क्षमा, शांती या सद्‌गुणांनी घरात प्रत्यक्ष स्वर्गाप्रमाणे अनुभूती होते, असे प्रतिपादन साध्वी उपप्रवर्तनी मंजुलज्योतिजी म.सा. यांनी आपल्या प्रवचना दरम्यान केले.

भोसरी येथे सुरू असलेल्या चातुर्मास महोत्सवा दरम्यान प्रवचन देताना साध्वी मंजुलज्योतिजी म्हणाल्या की, आपल्या हातून जीवांची हत्या होऊ नये, त्यांना त्रास होईल असा व्यवहार नसावा. आपल्याला व्यवहारामध्ये अनेकांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्रास होतो. त्यांच्यामुळे शरीराला, मनाला ज्या यातना होतात. त्यामुळे आपणास त्या व्यक्‍तीलाही अशाच प्रकारच्या यातना द्याव्यात, असा विचार येतो. परंतु भगवान महावीर स्वामींनी जीवन जगण्याची कला सांगताना गौतम स्वामींना सांगितले की, मनुष्याने क्षमाशील असावे. सर्व प्राणीमात्रांविषयी आकस ठेऊन व्यवहार न करता चांगला व्यवहार असावा. सर्वांचे कल्याण व्हावे, मंगल व्हावे, हीच भावना असावी. सर्वांनी शांततेमध्ये व्यवहार करावेत. जीवनामध्ये दया, क्षमा, शांती असेल तर ते घर निश्‍चित स्वर्गाप्रमाणे असेल. त्यासाठी वेगळे काही करण्याची गरज नसते. प्रत्यक्ष देवांचे वास्तव्य तेथे असते. याचा अनुभव प्रत्यक्ष येतो. आनंदी-आनंद असतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)