दयनीय नाट्यगृहांची नाट्य परिषदेकडून पाहणी

कलाकारांकडून तक्रार करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने उचलले पाऊल
संकलित माहितीचा अहवाल सांस्कृतिक मंत्र्यांना सादर करणार

राज्यातील नाट्यगृहांची दयनीय स्थिती आहे. मोडकळीस आलेल्या खुर्चा, अस्वच्छता, सुविधांचा अभाव आदी समस्यांनी ग्रासले आहे. याबाबत कलाकारांनी पालिका प्रशासन, राज्य पातळीवर वारंवार तक्रार केल्यानंतर शासनाकडून कोणतीच पाऊले उचलण्यात आली नाहीत. त्यामुळे नाट्यगृहांच्या स्थितीबाबत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने पुढाकार घेत पाहणी मोहीम हाती घेतली आहे. यांतर्गत नाट्य परिषदेच्या स्थानिक शाखा या शहरातील नाट्यगृहांची पाहणी करणार असून ऑगस्ट महिना अखेरीस परिषदेच्या मध्यवर्ती शाखेकडे संकलित माहिती जमा करणार आहे. त्यानंतर नाट्यगृहांच्या स्थितीवरून त्यांची वर्गवारी करून त्याचा अहवाल शासनदरबारी मांडण्यात येणार आहे.
राज्यातील नाट्यगृहांची स्थिती खूप दयनीय असल्याबद्दल कलाकारांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. त्यानंतरही फारसा फरक पडत नसल्याचे दिसून आल्याने नाट्य परिषदेतर्फे नाट्यगृहांची पाहणी मोहीम आखण्यात आली आहे. राज्यात परिषदेच्या 60-70 शाखा आहेत. या शाखांच्या पदाधिकाऱ्यांनी त्या गावातील नाट्यगृहांची पाहणी करण्याची सूचना करणारे पत्र पाठवले आहे. नाट्यगृहाचे स्वरूप, ते कोणत्या अवस्थेत आहे, काय सुधारणा करण्याची गरज आहे, अशी माहिती तसेच त्या नाट्यगृहाच्या सद्य स्थितीबाबतचे फोटोज, व्हीडिओ ऑगस्ट महिना अखेरपर्यंत संकलित करण्यात येणार आहे. त्यानुसार कोणत्या नाट्यगृहाचे नुतणीकरण करणे गरजेचे आहे, कोणत्या नाट्यगृहास डागडुजीची गरज आहे की पुनर्बांधणीची आवशक्‍यता आहे. हे सर्व पाहून त्याचा अहवाल सांस्कृतिक मंत्री तावडे यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. नाट्य परिषदेच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला असल्याचे परिषदेचे प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांनी सांगितले.
————————
नाट्य परिषदेचा अहवाल विचारात घेऊन सरकारने कायमस्वरुपी तोडगा काढला पाहीजे. नाट्यगृहांच्या दुरुस्तीचे काम हे प्रशासनाला करावे लागणार आहे. त्याचा खर्च नाट्य परिषदेला पेलवणारा नाहीये. मात्र, यापुढे नाट्यगृहांच्या व्यवस्थापनासाठी नाट्य परिषदेच्या सदस्याची नेमणूक करणार आहोत. ज्यामुळे नाट्यगृहांची व्यवस्था नीट पाहीली जाईल. महापलिका/नगरपलिका यांच्या नाट्यगृहांच्या व्यवस्थापनाचे काम पाहणाऱ्या अधिकाऱ्याचे या सर्व कामांकडे दुर्लक्ष होत असल्याने नाट्यगृहांची ही अवस्था झाली आहे.
शरद पोंक्षे-प्रमुख कार्यवाहक, नाट्यपरिषद

What is your reaction?
50 :thumbsup:
11 :heart:
1 :joy:
21 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)