दम्यावर हा घरगुती उपाय आहे गुणकारी

दमा या आजारात श्वासनलिका आकुंचनाने अरुंद होऊन श्वासोच्छ्वासाला अडथळा येतो. तसेच नलिकांचे आतील आवरण जाड होऊन त्यात स्त्राव पाझरतो. हा स्त्राव कोरडा व घट्ट होत जातो. त्यामुळे हवेची आतबाहेर ये जा पुरेशा प्रमाणात होत नाही. तसेच फुप्फुसांमध्ये रक्तातल्या वायूंची देवाण घेवाणही होत नाही. यामुळे दम लागतो. या आजाराची विशेषतः हिवाळ्याच्या दिवसांत अधिक काळजी घ्यावी लागते. यासाठी काही घरगुती उपाय…

आल्याचा रस आणि डाळिंबाचा रस समप्रमाणात घेऊन त्यात एक चमचा मध घालावा. दिवसातून तीन ते चार वेळा हे मिश्रण घ्यावे. काही दिवस हे औषध घेतल्यास दमा नियंत्रणात येतो. दम्याच्या पहिल्या पातळीवरच हा उपचार केल्यास दमा कमी होतो.

कपभर पाण्यात एक चमचा ठेचलेले आले घालून उकळावे. यानंतर हे पाणी गाळून घ्यावे. पाणी कोमट झाल्यावर त्यात अर्धा चमचा आल्याचा रस आणि एक चमचा मध घालून ढवळावे. सकाळी आणि संध्याकाळी हे मिश्रण घ्यावे. यामुळे फुफ्फुसाशी संबंधित त्रास नियंत्रणात राहतात. तसेच झोपताना श्वासोच्छ्वास चांगल्याप्रकारे करता येतो.

पाव कप दुधात लसणाचा छोटा तुकडा टाकून उकळावे. हे दूध कोमट झाल्यानंतर प्यावे. लसणातील घटक फुफ्फुसासाठी लाभदायक असतात. रात्री झोपताना श्वास घेण्यास अडचण येत असेल तर निलगिरी तेलाचे चार थेंब टाकलेला उिटश्‍यू पेपर कपाळावर ठेवावा. या तेलाच्या वासाने बंद झालेल्या नाकपुड्या उघडल्या जातात आणि सामान्यपणे श्वास घेता येतो.याचबरोर उकळत्या पाण्यात निलगिरी तेल घालून त्याची वाफ घेतल्यानेही चांगला फायदा होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)