दमदाटी करुन भूमिपूजने करायची कुठली हौस?

माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकरांचा आ. शंभूराज देसाई यांना खडा सवाल

पाटण – वाड्यापासून हाकेच्या अंतरावरील गावांमध्ये आज शेकडो एकर ऊस उभा राहीलेला दिसतोय हा बीन पाण्याचा ऊस आलेला नाही. हे आ. शंभूराज देसाई यांना कधी समजणार? पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे काम प्रगतीपथावर असतानाही दमदाटी करुन भूमीपूजन करण्याची ही कुठली हौस? असा खडा सवाल माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी आ. शंभूराज देसाई यांना पत्रकार परिषदेत केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

माजी मंत्री पाटणकर म्हणाले, 3-4 लाखांची भुमीपूजने म्हणजे विकास नव्हे ही कामे कोणतेही शासन आले तर होणारच आहेत. मात्र तुम्ही मंजूर केलेल्या कामांवर किती रक्‍कम खर्ची पडते याचा हिशोब काढला तर 50 टक्‍के रक्‍कम सुध्दा खर्ची पडत नाही. मग उरलेली रक्‍कम जाते कुठे याचाही शोध जनतेने घेतला आहे. पूर्वीच्या योजनांचे नाव बदलून आम्ही योजना केली सांगणाऱ्यांनी यापूर्वीची 30 फूटापर्यंत विहीरीचे काम झाले असताना आणि काम सुरु असताना तुम्ही पुन्हा स्वतःच्या हट्टासाठी शासकीय यंत्रणेला भुमीपूजन करायला लावण्याचे काय कारण? बिबी-सुरुल व परिसरातील लोकांनी स्वतःच्या हिंमतीवर पाण्याची व्यवस्था केली आहे. योजना मंजूर होवून कामही सुरु झाले. परंतू त्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-भूमीपूजन करुन तुम्ही घेतले आणि आता तिसऱ्यांदा भूमीपूजन करण्याचे काय कारण? असाही सवाल पाटणकरांनी केला.

ते पुढे म्हणाले, मणदूरे विभागातील सगळी धरणे स्वतःच्या हट्टापायी बंद पाडण्याचे काम गेल्या साडे चार वर्षात या लोकप्रतिनिधींनी केले आहे. जेवढे पाणी सध्या धरणांमध्ये उपलब्ध आहे, त्यावर शेकडो एकर ऊस उभा आहे. मात्र तो तुम्ही तुमच्या कारखान्याला नेत नाही. शेकडो एकर ऊसाला आम्ही पाणी वापरतोच त्यातलेच पाणी पिण्यासाठी वापरु तुम्ही काळजी करु नका. धरणापासून काही मीटर अंतरावर असणाऱ्या गावांना टॅंकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. जतनेला तुम्ही पाणी देवू शकत नाही. हे तुमच्या निष्क्रीयतेचे उदाहरण आहे.

कारखान्याच्या विश्रामगृहाच्या खिडकीतून दिसणाऱ्या मरळी-सोनवडे आणि बेलवडे या ग्रामस्थांवर ठेवलेला कर्जाचा बोजा कसा हटवायचा ते अगोदर बघा. तीन मुख्यमंत्री आणून स्वतःची हौस भागविण्यासाठी शेतकऱ्यांच्या पैशाची उधळण केली, हे तालुक्‍याने अनुभवले आहे. स्वतःच्या विभागातील कॅनॉलची कामे तुम्ही पूर्ण करु शकला नाही. ते मणदुरे विभागाचे तुम्ही काय कल्याण करणार? मुख्यमंत्र्यांना आणून ई-भूमीपूजने, ई-उद्‌घाटने करुन लोकांची फसवणूक करत आहात. सुरुल गावाला पाणी कमी पडतेय ते तुमच्या निष्क्रियतेमुळेच. हे तिथल्या लोकांना चांगलेच माहीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)