हिंजवडी – रस्त्याच्या बाजूला लघुशंकेसाठी थांबलेल्या कार चालकाला लुटून महत्वाची कागदपत्रे आणि कार जबरदस्तीने नेली. हा प्रकार कात्रज देहूरोड बायपास रोडवर बावधन येथील चांदणी चौकाजवळ पहाटे साडेचारच्या सुमारास घडला.

संतोष कुमार शिंदे (वय-24, रा. नवी सांगवी, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिंदे यांनी त्यांची कार (एमएच 14 / जीडी 5984) हिंजवडी येथील एका खासगी कंपनीला लावली आहे. त्यावर शिंदे स्वतः चालक म्हणून काम करतात. शिंदे कंपनीतील कर्मचाऱ्यांना आणण्यासाठी जात होते. ते लघुशंकेसाठी थांबले. त्यावेळी अज्ञात दोघेजण कारमधून त्यांच्याजवळ आले. दोघांनी मिळून शिंदे यांना दमदाटी करत क्रेडिट, डेबिट कार्ड, महत्त्वाची कागदपत्रे आणि कार असा एकूण 8 लाख 10 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून पोबारा केला. हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक डी. एन. निकम तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)