दबाव आणला गेला – न्या. इंदिरा बॅनर्जी यांचा आरोप

नवी दिल्ली – आपल्यावर दबाव आणला गेल्याचा आरोप सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी यांनी केला आहे. हॉटेल रॉयल प्लाझाशी संबंधित प्रकरणी आपल्यावर दबाव आणला जात असल्याचे न्या. इंदिरा बॅनर्जी यांनी भर न्यायालयात सांगितले. न्या. अरुण मिश्रा आणि न्या. बॅनर्जी यांच्या पिठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू न्या. बॅनर्जी यांनी हा दावा केला. अशा प्रकारे न्यायाधीशांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न म्हणजे न्यायालयाचा अवमान समजला जातो.

आपल्या दालनामध्ये नियमित वार्तालापानंतर वरिष्ठ वकील प्रलंबित प्रकरणांबाबत चर्चा करत असतात, असे न्या. बॅनर्जी म्हणाल्या. कोणीतरी फोनवरूनही त्यांच्यावर दबाव आणला असेही त्यांनी सूचित केले. मात्र त्यासंदर्भातील स्पष्ट उल्लेख मात्र त्यांनी केला नाही. न्या. इंदिरा बॅनर्जी या मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश होत्या. अलिकडेच त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी बढती देण्यात आली आहे.

हॉटेल रॉयल प्लाझाशी संबंधित प्रकरणाच्या सुनावणीपासून न्या. बॅनर्जी यांनी स्वतःला बाजूला ठेवू नये. अन्यथा अशाप्रकारे न्यायाधीशांवर दबाव आणून सुनावणीपासून दूर केले जाऊ शकेल, अशी विनंती वरिष्ठ विधीज्ञ शाम दीवाण यांनी न्या. बॅनर्जी यांना केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)