“दबंग-3’च्या शूटींगपूर्वी “रज्जो’चा मोठा खुलासा

सोनाक्षी सिन्हा लवकरच सलमान खान सोबत दबंगच्या तिसऱ्या सिरीजमध्ये म्हणजे “दबंग-3’मध्ये पुन्हा तुमच्या भेटीस येत आहे. सोनाक्षीने “दबंग’ चित्रपटातून बॉलीवुडमध्ये यशस्वी पर्दापण करत एकापेक्षा एक हिट चित्रपट देत तिने यशस्वीपणे वाटचाल सुरू ठेवली आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास “दबंग 3′ या चित्रपटाचे शूटिंग ती लवकरच सुरू करणार आहे.

“दबंग 3’बाबत सोनाक्षीने मोठा खुलासा केला असून तो सलमानच्या चाहत्यांसाठी आनंद देणार आहे.चित्रपटात महत्त्वाचे पात्र साकारणारी सोनाक्षी सिन्हा हा चित्रपट करण्यास फारच उत्साहित आहे. सोनाक्षी म्हणाली, सलमानचा “दबंग 3′ चित्रपट एकदम मसालेदार आणि मनोरंजन करणारा असेल. प्रेक्षकांना टाळ्या वाजविण्याची पूर्ण संधी मिळणार असल्याचे ती म्हणाली.

या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभु देवा करणार असल्याचेही तिने सांगितले. लवकरच “दबंग-3’ची शूटिंग सुरु होणार असून मी अगोदरच्या चित्रपटात रज्जोच्या अवतारात दिसली होती. सलमान खानही पूर्वीप्रमाणे चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसेल. या चित्रपटातही “चुलबुल पांडे’ आणि “रज्जो’चा रोमांस प्रेक्षकांच्या मनावर झडप घालेल, असे सोनाक्षी म्हणाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)