दफ्तर धोरणाचा नुसताच गाजावाजा

संदीप

मुलांचं दप्तर म्हणजे अनेकदा गोडाऊन असतं. या ओझ्यामुळे पाठ दुखतेच शिवाय त्याचे इतरही त्रास असतातच. या दप्तरात अनेक गोष्टी असतात ज्या गरज म्हणून मुलांना सांभाळाव्या लागतात. शालेय मुलाचं हे दप्तराचं ओझं कमी व्हावं यासाठी मुलांनीच सुचवलेले हे काही उपाय.

मे महिन्याची सुटी संपत येते आणि खरेदीची लगबग सुरू होते. स्टेशनरी आणि पावसाळी सामान विकणारी दुकानं ओसंडून वाहू लागतात. कोटयवधी रुपयांची उलाढाल होते. हे सारं बघताना वाटतं, “खर्च करणारे आम्हीच. वाढत्या महागाईवर तावातावानं बोलणारे आम्हीच! मुलांच्या पाठीवरच्या ओझ्याबद्दल तक्रार करणारे पण आम्हीच! खरंच ही खरेदी आवश्‍यक असते का? आपल्या लहानपणी असं नव्हतं, तरी मुलं शिकत होती. मोठी होत होती. हा सारा खर्च टाळला तर..?
जरतरच्या गुंत्यात न अडकता शाळेत जाऊनच मुलांशी गप्पा मारायच्या असं ठरवलं.

शाळेत पोहोचले तेव्हा शाळेत विसरून गेलेल्या कंपास बॉक्‍स, गाइड्‌स यांचा ढीग कोपऱ्यात पडला होता. त्याच्याकडे बोट दाखवत मी प्रश्‍न केला, “कशाला रे ही गाइड आणि वर्कबुक्‍स खरेदी करता? पुस्तकांपेक्षा काय वेगळं असतं त्यात?’ राज, मनोज, अक्षय अशा आठ-दहा जणांचा गट “काय प्रश्‍न विचारताय?’ असा चेहरा करत म्हणाले, “मग अभ्यास कसा करायचा? परीक्षेच्या वेळी यातलीच तर उत्तरं आम्ही पाठ करतो.’ अर्थ सरळ होता. पाठयपुस्तक वाचायचं असतं. त्यातली उत्तरं शोधायची असतात हे त्यांना घरी वा शाळेत कोणी सांगितलेलं नव्हतं.

अगदी लहान वयापासून काहीबाही सबब पुढे करून पालकांनी त्यांना ही सवय लावली होती. त्यांच्याच वर्गातली सायली आणि वर्षां पुढे सरकल्या. “बाई, यांची पुस्तकं नेहमी फाटलेली असतात. किती तरी वेळा ती हरवतात, विसरतात. कुठेही टाकलेली असतात आणि वर्गातला गृहपाठ ही सगळी फक्त गाइडमध्ये पाहून वहीत छापतात. म्हणून तर परीक्षेत आणि ओबीटी म्हणजेच ओपन बुक टेस्टमध्येपण यांची तारांबळ उडते.’

त्यांच्यापेक्षा थोड्या मोठ्या सई, सोनाली, अजय यांनी आता आघाडी सांभाळली. “बाई, असं काही खरेदी करायचा ट्रेंडच झालाय. पुस्तकं फुकट मिळतात. वहयांचं पण फुकट वाटप किती तरी जण करतात. मग पालक इथे पैसे खर्च करतात. मुलं लिहायचा कंटाळा करतात. म्हणून मग वर्कबुक खरेदी केली
जातात.

अगदी लहान वयात पालक जवळ बसवून ती सोडवून घेतात. मग मात्र ती कोरीच राहतात. शाळेचा आणि क्‍लासचा गृहपाठ करतानाच वेळ संपतो.’ दप्तराच्या ओझ्यापेक्षा अंमलबजावणीच्या धोरणाचाच जास्त गाजावाजा झाला आहे. प्रत्यक्षात ओझे कसे कमी करायचे यावर अनेक मतांतरे वेगवेगळ्या पध्दतीने मांडले जात असल्यास नक्‍की कोणत्या दिशेने रचना निश्‍चित करायची यावर खरी संभ्रमावस्था आहे. आनंददायी शिक्षण ही मुलांसाठी काळाची गरज आहे. मात्र दप्तराच्या ओझ्याखाली शिक्षण व्यवस्थेचा काळ पाहणे हे निश्‍चितच पुरोगामी महाराष्ट्राला भुषणावह नाही


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)