दफन केलेली बालिका सात तासानंतर जिवंत मिळाली…

ब्राझीलमधील घटना
कॅनराना (ब्राझील) – जिवंतपणीच दफन करण्यात आलेली एक नवजात बालोका सात तासांनंतर जिवंत मिळाल्याची घटना ब्राझीलमध्ये घडली आहे. कॅनरान शहरातील शिन्गू नॅशनल पार्कमध्ये वस्ती करून असलेल्या कामयाउरा जमातीच्या एक परिवाराने आपल्या नवजात बालिकेला घराच्या मागे जिवंत गाडून टाकले होते. पोलीसांना या घटनेचे खबर लागताच त्यांनी तेथे जाऊन सात तासांनी त्या बालिकेला खड्ड्यातून बाहेर काढले. नवलाची गोष्ट म्हणजे सात तासांनंतरही ती बालिका जिवंत होती.

बालिका जन्मल्यानंतर मरण पावल्याने तिचे दफन केले असा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला असला, तरी तिची हत्या करण्याचा प्रयत्न झाला असल्याचा पोलीसांना संशय आहे.

दफन करण्यात आलेल्या बालिकेच्या शरीरावर वस्त्रे नव्हती आणि तिची नाळही कापण्यात आलेली नव्हती. तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती सुधारत आहे.

या प्रकरणी बालिकेच्या आजीला हत्येचा आरोपावरून अटक करून सोडण्यात आले आहे. पुढील पोलीस तपास चालू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)