दत्ता सानेंच्या गटनेतेपदावर शिक्‍कामोर्तब

– विभागीय आयुक्‍तांचे महापालिकेला पत्र

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेतेपदी नगरसेवक दत्ता साने यांची अधिकृतपणे नियुक्ती झाली आहे. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाने अधिकृतपणे नोंदणी झाल्याचे पत्र बुधवारी (दि.16) महापालिकेतील नगरसचिव विभागाला पाठविले आहे.

महापालिकेत विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेतेपदी नगरसेवक दत्ता साने यांची नियुक्ती करण्यासाठी 8 मे रोजी विभागीय आयुक्तांकडे नोंदणी करण्यात आली होती. याबाबतची प्रशासकीय प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर विभागीय कार्यालयाने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेतेपदी योगेश बहल यांच्याऐवजी दत्ता साने यांची नेमणूक झाली आहे. या बदलाची नोंद घ्यावी, अशा आशयाचे पत्र पुणे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी नगरसचिव विभागाला पाठविले आहे. त्यामुळे दत्ता साने यांची विरोधीपक्ष नेतेपदी नियुक्ती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापौर नितीन काळजे हे उद्या (दि.17) साने यांना विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती झाल्याचे अधिकृत पत्र देणार आहेत.

दरम्यान, पिंपरी महापालिकेच्या फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादीचे केवळ 36 नगरसेवक निवडून आले होते. महापालिकेतील सत्ता गेल्यानंतर पाहिल्यांदाच विरोधी पक्षात बसलेल्या राष्ट्रवादीने तगडा मोहरा असलेल्या योगेश बहल यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपविली होती. त्याचवेळी प्रत्येकवर्षी विरोधी पक्षनेता बदलण्यात येणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले होते. 17 मार्च 2017 रोजी विरोधी पक्षनेतेपदी बसलेल्या बहल यांनी एक वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर पदाचा राजीनामा दिला होता. त्यापुर्वीच नगरसेवक नाना काटे आणि दत्ता साने हे या पदाकरिता इच्छूक होते. त्यानंतर ही प्रक्रिया राबविण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)