दत्तात्रय कोतेंकडून वृद्ध महिलेला स्व: खर्चातून नळजोड

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवानिमित्त शिर्डीतील गणेवाडीत विधायक उपक्रम
शिर्डी – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त शिर्डीत मनसे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कोते यांनी गणेशवाडी येथे वार्ड क्र.14 मध्ये स्वखर्चाने मंगला वगरे या वृद्ध महिलेला नगरपंचायतच्या पिण्याच्या पाण्याचा नळजोड दिला. गरिबांचा नगरसेवक अशी उपाधी यावेळी नागरिकांनी दत्तात्रय कोते यांना दिली.
ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दत्तात्रय कोते यांनी वायफळ खर्चाला फाटा देत गणेशवाडी भागातील वार्ड क्र. 14 मध्ये मंगला विश्‍वनाथ वगरे या वृद्ध गरीब महिलेला स्वखर्चाने पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्‍शन जोडून दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कोते, ज्ञानेश्‍वर पवळे, संपत हातंगळे, प्रशांत ठोंबरे, भारत बावीस्कर, विश्‍वनाथ गव्हाणे, कुणाल सांभारे, गणेश भालेराव, देवगडे, राहुल जगताप, पाणीपुरवठा विभागाचे नरोडे आदी उपस्थिथ होते.
जिल्हाध्यक्ष कोते म्हणाले की, राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेच्या वतीने वायफळ खर्चाला फाटा देत वार्डातील गोरगरिब नागरिकांना स्वखर्चाने नगरपंचायतच्या पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्‍शन जोडून देण्यात आले.
यावेळी मंगल वगरे यांनी मनोगत व्यक्‍त करताना गहिवरून आले. वगरे म्हणाल्या की, आम्ही नगरसेवक दत्ताभाऊंना शब्द टाकला आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता नळकनेक्‍शन स्वखर्चाने जोडून दिले. मागील काळात नगरसेवकपदावर नसतांनाही त्यांनी संपूर्ण वार्डात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)