दत्तवाडीत अंदाधुंद गोळीबार करणारे अटकेत

दत्तवाडीत अंदाधुंद गोळीबार करणारे अटकेत
……………
पुणे, दि.27 – दत्तवाडी येथे पूर्ववैमनस्यातून अंदाधुंद गोळीबार करण्यांना पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी रात्री ही घटना घडली होती. यामध्ये एकाच्या पाठीवर गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता.
रोहीत उटाडा, विजय ननावरे, रोहीत गायकवाड अशी अटक आरोपींची नावे आहेत. या घटनेत सुरज यशवद हा जखमी झाला होता. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.
दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार रोहीत उटाडा याचा वाढदिवस त्याचे साथीदार रस्त्यावर साजरा करत होते. यावेळी उटाडाबरोबर असलेल्या अक्षय मारणे याने झेड.एल.बॉईज ग्रुपच्या मयुर भगरेला आमच्याकडे काय पाहतोस असे म्हणत जाब विचारला. यातून वाद वाढल्याने रोहीत उटाडा व विजय ननावरे यांनी साथीदारांसह दोन पिस्तूल काढुन झेड.एल.ग्रुपच्या सदस्यांवर अंदाधुंद गोळीबार केला. यात सुरज यशवद गोळी लागून जखमी झाला. यानंतर गोळीबार करणारे आरोपी फरार झाले होते. हे तिघेही आरोपी म्हात्रे ब्रीजजवळ आले असल्याची माहिती मंगळवारी पोलीस उपनिरीक्षक अनिल डफळ यांना मिळाली होती. त्यानुसार दोन पथके तयार करून आरोपींना पकडण्यात आले. रोहीत उटाडाकडून गुन्ह्यात वापरलेले एक देशी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, पोलीस उपायुक्त डॉ.प्रविण मुंढे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)