दत्तक पालकांनी सोडून दिलेल्या मुलीला स्पेनमधून परत आणणार

केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांची माहिती

नवी दिल्ली – स्पेनमध्ये दत्तक पालकांनी सोडून दिलेल्या भारतीय मुलीला पुन्हा मायदेशी आणण्यासाठी आवश्‍यक ते सर्व काही करण्याची आपली ईच्छा असल्याचे महिला आणि बालकल्याण विभागाच्या केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी सांगितले आहे. यासाठी कोणतीही किंमत मोजायची आपली तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. स्पेनमधील एका दाम्पत्याने मध्यप्रदेशातून दत्तक घेतलेल्या 13 वर्षांच्या मुलीला सोडून दिले असल्याचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले होते, त्यावर प्रतिक्रिया देताना त्या बोलत होत्या.

दत्तक देण्याच्या वेळी ही मुलगी 7 वर्षांची आहे, असे मध्यप्रदेशातील दत्तक एजन्सीने या दाम्पत्याला सांगितले होते. या मुलीच्या वयाबद्दल फसवणूक झाल्याचा दावा या दाम्पत्याने केला होता. ही मुलगी सध्या स्पेनमधील झारगोझा येथील सरकारी निवासामध्ये आहे.

या मुलीला कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतात आणले जाईल. यासाठी महिला आणि बाल कल्याण मंत्रालय सर्व आवश्‍यक ती पावले उचलेल, असे गांधी म्हणाल्या. दत्तक विषयक एजन्सीच्या कायदा उल्लंघनाशी संबंधित अनेक प्रकरणे आहेत. त्याचीही दखल घेतली जात आहे, असे गांधी म्हणाल्या.

“उडान’ या संस्थेच्यासंदर्भात दत्तक विषयक तरतूदींचा भंग केल्याचा आरोप आहे. ही संस्था कारणे दाखवा नोटीसांना उत्तरही देत नाही. या संदर्भात चौकशी सुरू करण्यात आली आहे. स्पेनमधील दूतावासाशीही संपर्क साधण्यात आला असून संबंधित मुलीची काळजी घेण्याबरोबर तिला परत मायदेशी पाठवण्याबाबत पावले उचलण्याची सूचना करण्यात आली आहे. या संदर्भात भोपाळच्या एजन्सीविरोधात उत्तरदायित्व निश्‍चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)