दत्तकृपा महिला बचत गटाची व्यवसायभिमुखता

वाघोलीतील बचत गटाची लाखों रुपयांचे वाटप : महिला सबलीकरणाच्या वाटेवर

वाघोली, दि. 10 (प्रतिनिधी)- वाघोली महिला विकास आघाडीअंतर्गत 2007 मध्ये स्थापन झालेल्या दत्तकृपा महिला बचत गटाने 2012 ते 2016 या कालावधीत सहभागी असणारे 650 महिलांना त्यांनी केलेल्या बचत केलेल्या शंभर रुपये, दोनशे रुपये याप्रमाणे बचतीत पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर अनुक्रमाने शंभर रुपये बचत गटातील महिलांना 8650 सेवा शुल्क रक्‍कम तर दोनशे रुपये बचत करणाऱ्या महिलांना 20 हजार रुपये सेवाशुल्क रकमेचा परतावा केला आहे. लाखो रुपयांची बचतीबरोबरच कर्ज पुरवठा करून महिलांना आत्मनिर्भर करण्याचा निर्धार हवेली तालुक्‍यात केला आहे.
2016 मध्ये पाचशे रुपयांप्रमाणे सध्या बचत गट सुरू केला आहे. यामध्ये जवळपास 300 महिलादेखील सहभागी झाल्या आहेत. बचत गटांच्या माध्यमातून महिला दिनविशेष साजरे करणे तसेच महिलांसाठी वेगवेगळी प्रशिक्षण आयोजित करून व्यवसायभिमुख शिक्षण देणे, महिलांच्या वाढदिवसानिमित्त भेटवस्तू देणे तसेच गोरगरीब महिलांच्या कुटुंबातील व्यक्‍तींना आजारपणाच्या काळात आर्थिक मदत करणे आदी उपक्रम दत्तकृपा महिला बचत गटाच्या माध्यमातून राबवले आहेत. बचतीची सवय महिलांना लागावी त्यांचे कुटुंब आणि त्या सक्षम व्हाव्यात, या हेतूने तालुक्‍यामध्ये अनेक बचत गटांनी कामकाज चांगल्या पद्धतीने कार्यरत ठेवले आहे. याचाच एक भाग म्हणून नाममात्र व्याजदरांमध्ये महिलांना दिलेली कर्जे आणि त्या कर्जातून महिलांना कुटुंबासाठी व व्यवसायासाठी झालेली मदत ही वाघोलीतील महिलांसाठी व्यसायभिमुख उदाहरण म्हणावे लागेल. बचत गटामध्ये समाविष्ट असणाऱ्या महिलांनी दिलेली कर्जे व्याजासह रकमेचा परतावा करून एक अनोखा आदर्श उभा करून बचत गट कशाप्रकारे चालवावा, याचे उदाहरण समाजापुढे ठेवले आहे.

  • पंचपूर्तीमधून सबलीकरण
    वाघोलीतील दत्तकृपा महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर करून सेवा शुल्कासह रकमेचा परतावा करून बचत गट चालवण्याचा व त्याद्वारे महिलांना सक्षम करण्याचा अनोखा आदर्श समाजापुढे उभा केला आहे. याकामी भाग्यश्री घोरपडे, चंद्रकला शिंदे, शशिकला शिंदे, पूजा सातव पाटील, वर्षा सातव, राजश्री माने, कुंदा शिवरकर, सुधा चौधरी, अपर्णा बहिरट, मीनाक्षी भोसले, विजया सातव, स्वाती अल्हाट, वैशाली बहिरट, अनिता तोष्णीवाल, सुरेखा सोनवणे, मेघा चव्हाण, छाया बहिरट, उषा शिंदे, स्मिता शिरसागर, जयश्री गुळवे आदींनी मोलाची कामगिरी केली आहे .
  • बचत गटामार्फत महिलांचे संघटन करून महिलांच्या गरजा आणि स्वावलंबनाच्यादृष्टीने योग्य ते प्रयत्न केल्याने अनेक महिला सक्षम झाल्या आहेत. हाच उद्देश बचत गट स्थापनेमागील होता. याकामी राजेंद्र सातव पाटील यांची मोलाची साथ लाभली आहे. अशाच पद्धतीने बचत गट सर्वत्र चालवण्यात यावे हीच अपेक्षा.
    – जयश्री राजेंद्र सातव पाटील. अध्यक्षा, दत्तकृपा महिला बचत गटाच्या
  • बचत गटांमुळे मुलांच्या शिक्षण, आजारपण, लग्न यासाठी गेल्या दहा वर्षांमध्ये बऱ्याचवेळा बचत गटाने अर्थसहाय्य केले. बचत गट संपल्यानंतर त्याचा परतावा देखील अतिशय चांगल्या प्रकारे मिळाला आहे, याचे समाधान आहे.
    – सविता दत्तात्रय गोडसे, बचत गट सभासद.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)